Maximum allowable speed limit: भारतासह परदेशातही वाहनांच्या वेगमर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत. काही देशांत वाहनांना १२०-१४० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, असेही काही देश आहेत, जिथे वाहनचालक चक्क १६० किलोमीटर प्रतितास किंवा त्यापेक्षा अधिक वेगाने वाहन चालवू शकतात. या यादीत जर्मनी देश टॉपला आहे. भारतात १२० किलोमीटर/ प्रतितास वेगाने वाहन चालवण्यात परवानगी आहे. दरम्यान, जगभरात कोणत्या देशात किती वेगाने वाहन चालवली जातात? याची अचूक माहिती जाणून घेऊयात.
जर्मनीतील अनेक रस्त्यांवर अमर्यादीत वेगात वाहन चालवण्याची परवानगी आहे. या रस्त्यावर वाहनचालक वाटेल त्या वेगात वाहन चालवू शकतो. जर्मनीत काही महामार्गाचे भाग केले आहेत, ज्यात वेगमर्यादा निश्चित केलेली नाही. त्यामुळे या यादीत जर्मनी पहिल्या क्रमांकावर आहे. जर्मनीनंतर यूएई दुसऱ्या क्रमांकावर आहे. युएईमध्ये १६० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहन चालवता येऊ शकते. मात्र, ही वेगमर्यादा ठराविक रस्त्यांवरच लागू आहे.
सर्वाधिक वेग मर्यादा असलेले देश
बल्गेरिया- १४० किमीटर/प्रतितास
कझाकस्तान - १४० किमीटर/प्रतितास
पोलंड - १४० किमीटर/प्रतितास
सौदी अरेबिया - १४० किमीटर/प्रतितास
तुर्की - १४० किमीटर/प्रतितास
अमेरिका - १३७ किमीटर/प्रतितास
रशिया - १३० किमीटर/प्रतितास
रोमानिया - १३० किमीटर/प्रतितास
सर्बिया - १३० किमीटर/प्रतितास
नेदरलँड्स - १३० किमीटर/प्रतितास
बांगलादेश - ८० किमीटर/प्रतितास
टांझानिया - ८० किमीटर/प्रतितास
मकाऊ - ८० किमीटर/प्रतितास
सिंगापूर - ९० किमीटर/प्रतितास
आइसलँड - ९० किमीटर/प्रतितास
नायजेरिया - १०० किमीटर/प्रतितास
मलेशिया - ११० किमीटर/प्रतितास
मेक्सिको - ११० किमीटर/प्रतितास
संबंधित बातम्या