Mpox Outbreak : जागतिक आरोग्य संघटनेकडून एमपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित, किती धोकादायक आहे हा व्हायरस?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mpox Outbreak : जागतिक आरोग्य संघटनेकडून एमपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित, किती धोकादायक आहे हा व्हायरस?

Mpox Outbreak : जागतिक आरोग्य संघटनेकडून एमपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित, किती धोकादायक आहे हा व्हायरस?

Published Aug 15, 2024 12:20 AM IST

Mpox Outbreak : आफ्रिका सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने जाहीर केले की एमपीओएक्सचा उद्रेक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी आहे, ज्यात ५०० पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत.

जागतिक आरोग्य संघटना (Representative Photo)
जागतिक आरोग्य संघटना (Representative Photo)

जागतिक आरोग्य संघटनेने कांगो आणि आफ्रिकेतील इतरत्र एमपॉक्सचा उद्रेक जागतिक आणीबाणी म्हणून घोषित केला आहे.  डझनाहून अधिक देशांमध्ये मुले आणि प्रौढांमध्ये या व्हायरसची लागण झाली आहे.  विषाणूचा हा प्नकार नवीन असून आफ्रिकेत लसीचे मोजकेच डोस उपलब्ध आहेत.

जगभरात मंकीपॉक्स म्हणजेच Mpox व्हायरस गतीने पसरत आहे. गेल्या काही दिवसापासून या विषाणूचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. या विषाणूमुळे आरोग्य विभाग व लोक चिंतेत आहेत. या व्हायरसचे वाढते रुग्ण पाहून जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिवेंशन (CDC) ने यावर चिंता व्यक्त केली आहे. एसपॉक्सचा कहर  पाहून सीडीसीने आफ्रिकेत पब्लिक हेल्थ इमरजेंसी घोषित केली आहे. डब्ल्यूएचओने याचा प्रसार पाहून आपत्तकालीन बैठक बोलावून हा निर्णय घेतला. 

यावर्षी १५ हजाराहून अधिक रुग्ण- 

एमपॉक्सचा प्रसार गतीने होत आहे. यावर्षी आतापर्यंत एमपॉक्स व्हायरसमुळे १५ हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. भारतात आतापर्यंत २७ रुग्ण आढळले आहेत. या व्हायरसमुळे ४६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एमपॉक्सचे क्लेड १ आणि क्लेड १b नावाचे दोन प्रकार आहेत. अन्य व्हायरसच्या तुलनेत एमपॉक्स गतीने पसरतो. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी या व्हायरसच्या प्रसारात १६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

एमपॉक्सची लक्षणे 

  • एमपॉक्सने संक्रमित रुग्णाच्या शरीरावर अनेक प्रकारचे बदल दिसून येतात. 
  • या व्हायरसमुळे स्नायूमध्ये वेदना होतात. 
  • पाटदुखी तसेच डोके दुखीचा त्रास होतो. 
  • या व्हायरसमुळे थंडी वाजून ताप येतो.
  • गुडघेदुखी व कंबरदुखी होते. 

किती धोकादायक आहे एमपॉक्स व्हायरस? 

एमपॉक्स व्हायरस एक प्रकारचे इंफेक्शन आहे. जो सामान्यपणे खूपच कमी लोकांना होते. एमपॉक्सने संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने याचा प्रसार होतो. यामुळे संक्रमित झाल्याने रुग्णामध्ये फ्लू सारखे लक्षण दिसून येतात. याकडे दुर्लक्ष करणे काही वेळी धोकादायक बनू शकते.

आफ्रिका सीडीसीने यापूर्वी म्हटले होते की एमपीओएक्स, ज्याला मंकीपॉक्स देखील म्हणतात, या वर्षी १३ देशांमध्ये आढळले आहे . सर्व रुग्ण व मृत्यूंपैकी ९६ टक्क्यांहून अधिक प्रकरणे कांगोमधील आहेत.  गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत रुग्णसंख्या १६० टक्क्यांनी वाढली असून मृत्यूचे प्रमाण १९ टक्क्यांनी वाढले आहे. आतापर्यंत १४ हजारांहून अधिक रुग्ण आढळले असून ५२४ जणांचा मृत्यू झाला आहे.

आफ्रिका सीडीसी आपत्कालीन गटाचे अध्यक्ष आणि दक्षिण आफ्रिकेचे संसर्गजन्य रोग तज्ज्ञ सलीम अब्दूल करीम यांनी सांगितले की, आम्ही आता अशा परिस्थितीत आहोत जिथे (एमपीओएक्स) मध्य आफ्रिका आणि आसपासच्या अनेक शेजाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. कांगोमधून पसरणाऱ्या एमपॉक्सच्या नव्या आवृत्तीचा मृत्यूदर ३ ते ४ टक्के असल्याचे त्यांनी नमूद केले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर