Viral News: वॉशरूममध्ये कॅमेरा लावून महिलांचे बनवले व्हिडिओ; प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील धक्कादायक घटना!-worker arrested for installing camera in restaurant toilet ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News: वॉशरूममध्ये कॅमेरा लावून महिलांचे बनवले व्हिडिओ; प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील धक्कादायक घटना!

Viral News: वॉशरूममध्ये कॅमेरा लावून महिलांचे बनवले व्हिडिओ; प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील धक्कादायक घटना!

Aug 17, 2024 07:59 PM IST

Camera Installing Restaurant Ladies Toilet: उत्तराखंड येथील देहरादूनमधील रेस्टॉरंटमध्ये महिलांच्या वॉशरूमध्ये कॅमेरा लावून महिलांचे व्हिडिओ बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले.

 वॉशरूममध्ये कॅमेरा लावून महिलांचे बनवले व्हिडिओ (Represantative Image)
वॉशरूममध्ये कॅमेरा लावून महिलांचे बनवले व्हिडिओ (Represantative Image)

Restaurant Ladies Toilet Camera News: उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली. एका प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या महिलांच्या वॉशरूमचा कॅमेरा लपवून त्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या खुलाशानंतर संपूर्ण रेस्टॉरंटमध्ये खळबळ उडाली. या घटनेनंतर या रेस्टॉरंटमध्ये नियमितपणे जाणाऱ्या महिलांना मोठा धक्का बसला आहे.

हे प्रकरण डेहराडूनमधील आनंदम रेस्टॉरंटचे आहे. या रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या विनोद नावाच्या कर्मचाऱ्याने महिलांच्या वॉशरूममध्ये कॅमेरा लपवून ठेवला. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, वॉशरूमचे सिलिंग तोडून त्यामध्ये मोबाईल फोन लपवण्यात आला. मोबाईलचा कॅमेरा खालच्या दिशेने ठेवून त्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केली जात होती.

आनंदम रेस्टॉरंटमध्ये वॉशरूममध्ये गेलेल्या एका महिलेच्या हे लक्षात आले. याबाबत महिलेने सर्वांना सावध केले. काही वेळातच रेस्टॉरंटमध्ये उपस्थित सर्व लोक संतप्त झाले आणि त्यांनी व्यवस्थापकाला घेराव घातला. रेस्टॉरंटमध्ये उपस्थित असलेले लोक मॅनेजरला प्रश्न विचारताना दिसत आहेत. पण त्याने याबाबत बोलणे टाळले. लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या घटनेची तपासणी केली असता हा फोन रेस्टॉरंटमधील एका कर्मचारीचा असल्याचा उघड झाले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांना फोनमध्ये वॉशरूमचे अनेक व्हिडिओ सापडले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर लिहून आरोपी कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी पुरावा म्हणून फोनही जप्त केला आहे. मात्र, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरला आहे. रेस्टॉरंटच्या या निष्काळजीपणामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

छुपा कॅमेरा ओळखण्याच्या टीप्स

सार्वजनिक ठिकाणी वॉशरूमध्ये गेल्यानंतर छुपा कॅमेरा ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सार्वजनिक शौचालय किंवा मॉलच्या चेंजिंग रूममध्ये कोणत्याही प्रकारची वस्तू ठेवली असेल तर ती अवश्य तपासून पाहा. सहसा अशा ठिकाणी अशा कोणत्याही शोभेच्या वस्तू, घड्याळे, जादा दिवे लागत नाहीत, असे काही दिसले तर लगेच तपासून घ्या आणि त्यानंतरच कपडे बदला. चेंजिंग रूममध्ये किंवा टॉयलेटमध्ये लाईटचा स्विच असेल तर तो बंद करण्याचा प्रयत्न करा. कॅमेऱ्याचा प्रकाश मोबाइलच्या प्रकाशात परावर्तित होतो. लाईट चालू झाल्यावर कॅमेरा फ्लॅश होईल आणि कॅमेरा लपलेला आहे की नाही हे समजू शकेल.

विभाग