मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rahul Gandhi: राहुल गांधी यांच्या भाषणातील 'हत्या' शब्दासह अनेक शब्द हटवले! मग उरलं काय?

Rahul Gandhi: राहुल गांधी यांच्या भाषणातील 'हत्या' शब्दासह अनेक शब्द हटवले! मग उरलं काय?

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Aug 10, 2023 04:43 PM IST

Rahul Gandhi Speech Cut: संसदेत राहुल गांधींनी दिलेल्या भाषणातील हत्या या शब्दासह अनेक शब्द हटवण्यात आले.

rahul gandhi speech in parliament
rahul gandhi speech in parliament (PTI)

Rahul Gandhi Speech Murder Word removed: मणिपूर प्रकरण, दिल्ली सेवा विधेयक यासह अनेक मुद्द्यांमुळे संसदेचे पावसाळी अधिवेशन आतापर्यंत वादळी ठरले आहे. दरम्यान, लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला. यावेळी राहुल गांधींनी भारत मातेची हत्या झाली, असे वक्तव्य केले. त्यांच्या भाषणातील हत्या शब्दासह अनेक शब्द हटवण्यात आले आहेत. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात १५ वेळा हत्या हा शब्द वापरला होता.

ट्रेंडिंग न्यूज

भाजप सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी मणिपूर प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या झाली, असे वक्तव्य केले. लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींच्या भाषणातील हे वक्तव्य हटवले. राहुल गांधींनी आपल्या भाषणादरम्यान १५ वेळा हत्या शब्दाचा वापर केला होता. याशिवाय, देशद्रोही, हत्यारे आणि 'मारा' हे शब्दही काढून टाकण्यात आल्याची माहिती आहे.

"देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजूनही मणिपूरला भेट दिली नाही. कारण, ते मणिपूरला भारताचा भाग मानत नाहीत. मी काही दिवसांपूर्वीच मणिपूरचा दौरा केला होता. पण आमचे पंतप्रधान अजूनही तिथे गेले नाहीत. मोदींनी मणिपूरचे दोन तुकडे करून राज्य उद्ध्वस्त केले आहे", असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

पुढे राहुल गांधी म्हणाले की, भारत एक आवाज आहे. मोदींनी त्या आवाजाची हत्या केली आहे. मोदींनी मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली. मणिपूरच्या लोकांना मारून तुम्ही भारताची हत्या केली. तुम्ही भारत मातेचे तारणहार नाहीतर, तुम्ही भारत मातेचे मारेकरी आहात."

WhatsApp channel