मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News: महिलांनो असे कपडे घाला की...; 'या' व्हायरल पोस्टरने नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या!

Viral News: महिलांनो असे कपडे घाला की...; 'या' व्हायरल पोस्टरने नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या!

Jul 05, 2024 12:23 PM IST

Womens clothing Advice Poster: महिलांनी कसे कपडे घालावे, असा सल्ला देणारे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या पोस्टरवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

महिलांच्या कपड्यांसंंबंधित सोशल मीडियावरील एक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली.
महिलांच्या कपड्यांसंंबंधित सोशल मीडियावरील एक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली.

Viral Story: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, अशा घटनेला पुरुषांची मानसिकता कारणीभूत नसून महिलांचे तोकडे कपडे जबाबदार आहेत, असे म्हणणारे १०० पैकी ८० लोक आजही सापडतील. याविरोधात अनेक महिलांनी आवाज उठवत आमचे बलात्काराला आमंत्रण देत नाहीत, असे ठणकावून सांगितले. आता सोशल मीडियावर एक पोस्टर व्हायरल होत आहे, ज्यात महिलांनी कोणते कपडे घातले पाहिजेत, याबाबत सांगण्यात आले. मात्र, या पोस्टरमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या व्हायरल पोस्टरमध्ये असे लिहिले आहे की, "महिलांनी असे कपडे घालावे की, कोणत्याही व्यक्तीने त्यांच्याकडे वाइट नजरने बघता कामा नये." मस्त ग्रुप नावाच्या गटाने हा महिलांना सल्ला दिला. फोटोमध्ये या पोस्टरच्या खाली आणखी एक पोस्टर दिसत आहे, ज्यात पुरुषांना सल्ला देण्यात आला. या पोस्टरमध्ये असे लिहिण्यात आले होते की,"पुरुषांनी मन इतके निखळ ठेवा की, कोणी कसेही कपडे घातले तरी नजर घसरता कामा नये." या दोन्ही पोस्टरची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. हे पोस्टर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर दोन गट तयार झाले आहेत. काहीजणांनी महिलांचे समर्थन केले आहे. तर, काहींनी महिलांच्या कपड्यांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

एका युजरने म्हटले आहे की, ज्या लोकांनी या पोस्टरचे तातडीने उत्तर दिले आहे, त्यांना पुरस्कार देण्यात यावा. दुसरा युजर म्हणाला की, ज्या महिला तोकडे कपडे घालत नाहीत, त्यांच्यासोबत गैरवर्तन होत नाही का? कपड्यांना जबाबदार ठरवणे थांबवले पाहिजे. काही पुरूष महिलांना कोणत्याही कपड्यांमध्ये वाइट नजरेने बघतात. आणखी एका युजरने म्हटले आहे की, हे पोस्टर आणखी थोडे मोठे हवे होते. फक्त महिलांसाठी नव्हेतर पुरुषांसाठीही कपडे घालण्याबाबत निर्बंध तयार करण्यात यावे. योग्य वेळी, योग्य ठिकाणी योग्य कपड्यांची निवड केली पाहिजेत. महिला आणि पुरुष दोघांनीही याचे पालन केले पाहिजे.

 

WhatsApp channel
विभाग