मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Jama Masjid: दिल्लीतील जामा मशिदीत महिलांच्या प्रवेशाबाबत 'तालिबानी फर्मान', स्त्रियांसाठी अनेक अटी
जामा मशीद
जामा मशीद

Jama Masjid: दिल्लीतील जामा मशिदीत महिलांच्या प्रवेशाबाबत 'तालिबानी फर्मान', स्त्रियांसाठी अनेक अटी

24 November 2022, 15:52 ISTShrikant Ashok Londhe

Jama Masjid : दिल्लीतील जामा मशीद व्यवस्थापनाने निर्णय घेतला आहे की, एकटी महिला किंवा महिलांच्या समूहाला मशिदीत प्रवेश नाही. मात्र एखादा पुरुष त्यांच्यासोबत असल्यास त्यांच्या प्रवेशाला कोणताही हरकत नाही.

दिल्लीच्या जामा मशीद (jama masjid) व्यवस्थापनाने महिलांच्या प्रवेशाबाबत मोठा व वादग्रस्त निर्णय घेतला आहे. मशिदीत एकटी महिला किंवा महिलांचा समूह प्रवेश करू शकणार नाही. अट ठेवण्यात आली आहे की, एखाद्या पुरुष सदस्यासोबतच महिला मशिदीत जाऊ शकतात. मशीद कमिटीकडून आदेश जारी करताना दरवाजावर एका ओळीची नोटीस लावण्यात आली आहे की, मशिदीत मुलगी किंला मुलींच्या समूहास प्रवेश करण्यास मनाई आहे.

ट्रेंडिंग न्यूज

जामा मशिदीत आतापर्यंत महिलांच्या प्रवेशावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नव्हते. महिला नमाज पठणासाठी येत असतात. मात्र जामा मशीद व्यवस्थापन समितीचे आता म्हणणे आहे की, कुटूंबातील पुरुष सदस्याशिवाय महिलांना प्रवेश मिळणार नाही. म्हणजे कोणतीही महिला किंवा महिलांचा समूह मशिदीत प्रवेश करू शकणार नाही, तर त्यांच्यासोबत एखादा पुरुष नसेल. कमिटीच्या या निर्णयामुळे वाद होण्याची चिन्हे आहेत. दिल्ली महिला आयोगानेही या आदेशाची दखल घेतली आहे.

दिल्ली महिला आयोगाने या निर्णयाला तालिबानी फर्मान संबोधून नोटिस जारी केले आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी म्हटले की. दिल्लीच्या जामा मशिदीत शाही इमामांनी बोर्ड लावला आहे की, महिलांच्या प्रवेशावर मनाई आहे. हे लज्जास्पद व असंविधानिक आहे. त्यांना काय वाटते की, हा देश भारत नाही व ईराण आहे जेणेकरून महिलांसोबत भेदभाव केला जाईल आणि कोणी काही बोलणार नाही. मशिदीत जाण्याचा जितका हक्का पुरुषांना आहे, तितकाच हक्क महिलांनाही आहे. या आदेशाबद्दल आम्ही शाही इमामांना नोटीस जारी केले असून ही मनाई आम्ही काही करून हटवणार.

मशीद कमिटीचे स्पष्टीकरण -
जामा मशिदीचे पीआरओ सबीउल्लाह खानयांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, महिलांच्या प्रवेशावर निर्बध लादण्यात आलेले नाहीत. ज्या एकट्या मुली येतात त्या अन्य मुलांना वेळ देतात. येथे येऊन चुकीची वर्तवणक करतात. व्हिडिओ बनवले जातात. केवळ अशा गोष्टी रोखण्यासाठी ही मनाई करण्यात आली आहे. कुटूंबाबरोबर येण्याला मनाई नाही. मात्र कोणाला तरी वेळ देऊन येणे, मीटिंग पॉइंटबनवणे, पार्क समझणे, टिकटॉक व्हिडिओ बनवणे, डान्स करणे या गोष्टी कोणत्याचच धर्मस्थळावर योग्य नाहीत.

 

विभाग