Rapid Rail Metro Viral Video : दिल्ली मेट्रोमध्ये रिल्स बनवणे आता सामान्य गोष्ट झाली आहे. याबाबत अनेकदा DMRC कडे तक्रार करत अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणीही केली जाते. मात्र अजूनपर्यंत सोशल मीडिया रिल्स बनवण्यावर कोणत्याही प्रकारचा अंकूश ठेवण्यात प्रशासानाला यश आलेले नाही. दिल्ली मेट्रोनंतर आता नमो भारत रॅपिड ट्रेनमधील (namo bharat train) एक व्हिडिओ इंटरनेटवर तेजीने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही महिला रॅपिड मेट्रोमध्ये पारंपरिक कपडे परिधान करत डान्स करताना दिसत आहेत. लोकांना हा व्हिडिओ खूप पसंत पडत असून या व्हायरल व्हिडिओवर लोक प्रतिक्रिया देत आहेत.
गाझियाबाद ते मोदीनगरपर्यंत धावत असलेल्या नमो भारत ट्रेनमधील हा व्हिडिओ आहे. यामध्ये दोन ग्रामीण महिला नाचताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत उभी असलेली एक महिला मोबाइलच्या माध्यमातून त्यांचा व्हिडिओ बनवत आहे, तर अन्य महिला ताळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देत आहेत. नमो भारत ट्रेनची सेवा साहिबाबाद ते मोदीनगर नॉर्थ पर्यंत सुरू झाली आहे. एनसीआरटीसीकडून मेट्रो स्टेशन परिसर आणि ट्रेनच्या आतमध्ये व्हिडिओग्राफी करण्यास मनाई करण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल हा व्हिडिओ मोदीनगरच्या जवळपास बनवला असल्याची चर्चा आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत दिसते की, काही महिला मेट्रोच्या आतमध्ये डान्स करत आहेत. त्यांच्या जवळ बसलेल्या महिलाही त्यांना साथ देत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लेटफॉर्म इंस्टाग्राम वर @modinagar_walaa नावाच्या यूजरने शेअर केला आहे. आतापर्यून या व्हिडिओला दोन लाखाहून अधिक लोकांनी लाईक्स केले असून अनेक युजर्स यावर प्रतिक्रिया देत आहेत.
व्हायरल व्हिडिओवर लोक आपल्या प्रतिक्रिया देत असून अनेक युजर्सनी याला विरोधही केला आहे. एका यूजरने लिहिले की, मेट्रोमध्ये असे कृत्य करणे योग्य नाही. अन्य एका यूजरने लिहिले की, असे करून मेट्रो बंद करायचीय का, या पोस्टवर अनेक युजर्स गंमतीशीर रिएक्शन देत आहेत.