Japan Viral news : पूर्व आशियाई देश जपानमध्ये वृद्धांची वाढणारी मोठी संख्या आणि तरुणांची कमी संख्या ही गंभीर बाब बनली आहे. जन्मदर कमी झाल्याने मु लेआणि मुलींच्या प्रमाणात मोठी तफावत निर्माण झाली आहे. परिणामी ग्रामीण भागातील महिलांची घटती संख्या व अविवाहितांची वाढती संख्या ही सरकारसमोरील नवे संकट आहे. महिलांच्या घटत्या लोकसंख्येमुळे तरुणांना लग्नासाठी मुली मिळत असल्याने या समस्येवर मात करण्यासाठी जपान सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे.
सरकार अविवाहित महिलांना मोठ्या प्रमाणात पैसे देऊन त्यांना ग्रामीण भागात स्थायिक होण्यासाठी मोठी ऑफर देत आहे. जेणेकरून त्यांनी तेथे लग्न करावे आणि महिलांच्या घटत्या लोकसंख्येचा प्रश्न सुटेल. अविवाहित महिलांना टोकियो शहरातून ग्रामीण भागात लग्नासाठी जाण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असून असे करणाऱ्या प्रत्येक महिलेला ६ लाख रुपये सरकारतर्फे दिले जात आहेत.
जपान सरकारला आशा आहे की या योजणेमुळे टोकियोमध्ये शिक्षणासाठी किंवा कामासाठी येणाऱ्या तरुणींचा कल बदलेल आणि त्या ग्रामीण भागात राहून स्वयंरोजगार सुरू करतील. या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांच्या लोकसंख्येमध्ये समतोल राखण्याचा आहे. जपान टाईम्सच्या मते, सरकार महिलांसाठी मॅचमेकिंग कार्यक्रमांसाठी प्रवास खर्च देखील देण्याच्या तयारीत आहेत. या सोबतच त्यांना अतिरिक्त आर्थिक मदत करण्याची देखील सरकारची तयारी आहे.
२०२० च्या राष्ट्रीय जनगणनेनुसार, टोकियो वगळता जपानच्या ४७ प्रांतांपैकी ४६ मध्ये १५ ते ४९ वयोगटातील सुमारे ९.१ दशलक्ष महिला होत्या. ही संख्या समान वयोगटातील ११.१ दशलक्ष अविवाहित पुरुषांपेक्षा सुमारे २० टक्क्यांनी कमी आहे. अनेक ग्रामीण भागात हा फरक ३० टक्यांपर्यंत आहे.
सरकारच्या नवीन उपक्रमात टोकियोच्या २३ वॉर्डातून ग्रामीण भागात स्थलांतरित होणाऱ्या महिलांना ७ हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे ६ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की गेल्या काही वर्षांत टोकियो येथे पुरुषांपेक्षा अनेक महिलांनी स्थलांतर केले आहे. ग्रामीण भागातील शिक्षण आणि नोकऱ्यांचा अभाव हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. या कारणास्तव महिला कधीही परत त्यांच्या गावी जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या कमी होत आहे.
जपान सरकारपुढे कमी होणाऱ्या लोकसंख्येचे मोठे आव्हान आहे. येथील जन्मदर आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी केवळ ७२७२७७ मुलांच्या जन्मांची नोंद झाली होती, तर प्रजनन दर १.२० टक्के होता. हे देशाच्या स्थिर लोकसंख्येसाठी आवश्यक असलेल्या २.१ जन्म दारांपेक्षा खूप कमी आहे. "बऱ्याच लोकांना लग्न करायचे आहे पण त्यांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. आम्ही त्यांना मदत करू इच्छितो, असे टोकियोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.