नोकरीसाठी महिलेने केली अशी मागणी; HR अन् CEO झाले अवाक्, नेटीझन्समध्ये चर्चेचा विषय
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  नोकरीसाठी महिलेने केली अशी मागणी; HR अन् CEO झाले अवाक्, नेटीझन्समध्ये चर्चेचा विषय

नोकरीसाठी महिलेने केली अशी मागणी; HR अन् CEO झाले अवाक्, नेटीझन्समध्ये चर्चेचा विषय

Published Mar 15, 2024 05:24 PM IST

Viral News : एका तरुणीने नवीन जॉबसाठी अशी काही अट ठेवली की, सीईओ तसेच एचआरने डोकं पकडलं. या तरुणीने वार्षिक ४५ लाख पॅकेजची मागणी केली.

महिलेची पगाची अपेक्षा ऐकून कंपनी थक्क
महिलेची पगाची अपेक्षा ऐकून कंपनी थक्क

चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची सर्वांनाच इच्छा असते. खासगी नोकरी करणारे कर्मचारी नेहमी चांगल्या संधीच्या शोधात असतात. नुकतेच एका कंपनीत मुलाखतीसाठी गेलेल्या तरुणीच्या पगाराची अपेक्षा ऐकून एचआरपासून सीईओपर्यंत सर्वजण चक्रावून गेले आहेत. तरुणाला कामचा चार वर्षाचा अनुभव होता मात्र या अनुभवाच्या आधारावर तिने कंपनीकडे सॅलरीची जी मागणी केली, तो आता इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला आहे. कंपनीच्या सीईओनेही याबाबतचा किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टवर आता सोशल मीडिया यूजर्स कमेंट करत आहेत. 

वानशिव टेक्नोलॉजीजचे संस्थापक आणि सीईओ गौरव खेत्रपाल यांनी या मुलाखतीबाबतचा अनुभव सोशल मीडिया प्लेटफॉर्म 'एक्स' वर शेअर केला आहे. त्यांनी सांगितले की, नुकतेच त्यांच्या कंपनीत मुलाखतीसाठी एक चांगली कँडिडेट आली होती. त्यांनी म्हटले की, मुलाखतीत निवड झाल्यानंतर तरुणीचा अर्ज एचआरकडे पाठवला. मात्र एचआरकडून जे उत्तर आले ते चक्रावून टाकणारे होते. एचआरने सांगितले की, कँडिडेटकडे चार वर्षाचा एक्सपीरियन्स आहे. तिची सध्याची सॅलरी वार्षिक २८ लाख रुपये आहे. तिने ४५ लाख रुपयांची मागणी केली आहे. 

तरुणीची डिमांड ऐकून सीईओही अवाक् झाले आहेत. त्याची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टवर इंटरनेट यूजर्स कमेंट करत आपली प्रतिक्रिया देत आहेत. एक यूजरने कंपनीला सल्ला दिला आहे की, पुढच्या वेळी जॉब पोस्टिंगसोबत आपले बजेटही पोस्ट करा. यामुळे तुमच्या दोघांचा वेळ वाचेल. या पोस्टवर दुसऱ्या यूजरने म्हटले की, तुम्ही या तरुणीला हायर करण्यासाठी कर्ज घेऊ शकता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर