पंजाबमध्ये 'तालिबानी शिक्षा', चोरीच्या संशयावरून आईसह तीन मुलींच्या चेहऱ्याला काळे फासून काढली धिंड
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पंजाबमध्ये 'तालिबानी शिक्षा', चोरीच्या संशयावरून आईसह तीन मुलींच्या चेहऱ्याला काळे फासून काढली धिंड

पंजाबमध्ये 'तालिबानी शिक्षा', चोरीच्या संशयावरून आईसह तीन मुलींच्या चेहऱ्याला काळे फासून काढली धिंड

Jan 22, 2025 10:28 PM IST

पंजाबमधील लुधियाना येथे चोरीच्या संशयावरून एका महिलेला आणि तिच्या तीन मुलींच्या चेहऱ्याला काळे फासून त्यांची गावातून धिंड काढण्यात आली. यावेळी त्यांच्या गळ्यात 'मी चोर आहे' असे फलकही टांगण्यात आले होते.

महिलेसह तीन मुलींची चोरीच्या संशयातून धिंड
महिलेसह तीन मुलींची चोरीच्या संशयातून धिंड

पंजाबमधील लुधियाना येथे 'तालिबानी शिक्षे'शी संबंधित एक घृणास्पद प्रकरण समोर आले आहे. चोरीच्या संशयावरून एक महिला आणि तिच्या तीन मुलींच्या तोंडाला काळे फासून आणि गळ्यात 'मी चोर आहे' असे लिहिलेले फलक लावून त्यांची गावातून धिंड काढण्यात आली. ज्या कारखान्यात त्या काम करत होत्या, त्या कारखान्यातून कपडे चोरल्याच्या संशयातून महिलांना ही शिक्षा देण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत कारखाना मालकासह दोघांना अटक केली आहे. व्हिडिओ बनवणारा तिसरा आरोपी फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्याचा मालक, मॅनेजर आणि आणखी एका व्यक्तीविरोधात (ज्याने या कृत्याचा व्हिडिओ शूट केला) गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी कारखान्याच्या आवारात महिलांना बंधक बनवून त्यांचे चेहरे काळे केले आणि 'मी चोर आहे'  मी माझी चूक मान्य केली. त्यावर लिहिलेले फलक घेऊन त्यांची धिंड काढण्यात आली. 

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी कारखान्याचे मालक परमिंदर सिंग, मॅनेजर मनप्रीत सिंग आणि व्हिडिओग्राफर मोहम्मद कैश यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक कारखाना मालक आहे.

या घटनेवरून राज्यभरांत संताप व्यक्त केला जात आहे. पंजाब राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष कंवरदीप सिंह यांनी या घटनेची स्वत:हून दखल घेत ही तालिबानी शिक्षा असल्याचे म्हटले आहे. हा मुलांच्या हक्कांचा घोर भंग असून लुधियाना पोलिस आयुक्तांनी याप्रकरणी कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पंजाब राज्य महिला आयोगानेही या घटनेची गंभीर दखल घेत आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर