अजब प्रेमाची गजब गोष्ट..! आजी बनलेली महिला ३० वर्षीय प्रियकरासोबत गेली पळून, ८ वर्षापूर्वीही झाली होती बेपत्ता
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अजब प्रेमाची गजब गोष्ट..! आजी बनलेली महिला ३० वर्षीय प्रियकरासोबत गेली पळून, ८ वर्षापूर्वीही झाली होती बेपत्ता

अजब प्रेमाची गजब गोष्ट..! आजी बनलेली महिला ३० वर्षीय प्रियकरासोबत गेली पळून, ८ वर्षापूर्वीही झाली होती बेपत्ता

Jan 27, 2025 07:25 PM IST

Viral News :प्रेम कुणालाही होऊ शकतं. अनेकदा एखाद्या वृद्ध महिलेने आपल्या तरुण पुरुषाला हृदय दिले, तर कुठे वृद्ध आपल्या नातीच्या वयाच्या मुलीच्या प्रेमात पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

आजी बनलेली महिला प्रियकरासोबत फरार
आजी बनलेली महिला प्रियकरासोबत फरार

प्रेमाला वयाचं बंधन नसतं आणि मर्यादाही नसते, असं म्हटलं जातं. प्रेम हे ना जात-पाहते, ना उच्च-नीचपणा पाहते.  प्रेम कुणालाही व कोणावरही होऊ शकतं. अनेकदा एखाद्या वृद्ध महिलेने तरुण पुरुषाला हृदय दिले, तर कुठे वृद्ध आपल्या नातीच्या वयाच्या मुलीच्या प्रेमात पडल्याच्या घटना घडल्या आहेत. कुटुंबाची, समाजाची पर्वा न करता लोकांनी एकमेकांसोबत राहणे पसंत केले आहे. असाच एक प्रकार यूपीच्या कानपूर जिल्ह्यातून समोर आला आहे. येथे स्वत: आजी बनलेली एक महिला आपल्या प्रियकरासोबत फरार झाली. प्रियकरही महिलेच्या वयापेक्षा खूपच लहान आहे.

कुटुंबाच्या इज्जत पार धुळीला मिळवत ही महिला आपल्या ३० वर्षीय प्रियकरासह पळून गेली. ही बाब कुटुंबीयांना समजताच त्यांनी पोलिस ठाणे गाठले. आठ वर्षांपूर्वी एका तरुणासोबत आजी बनलेली ही  महिला फरार झाली होती, मात्र नंतर ती परत आली. घरच्यांनी समाजात इज्जत झाली जाईल, या भीतीने याची वाच्यता कुठेही न  करता तिला घरात ठेऊन घेतले. पण आताही महिलेने मर्यादा ओलांडली आहे.

हे प्रकरण बजरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे राहणाऱ्या एका फुल व्यापाऱ्याच्या घरात आई, पत्नी, तीन मुले आणि नातू असा परिवार आहे. फूल व्यापाऱ्याच्या आईने सांगितले की, काही दिवसांपूर्वी तिची सून ३० वर्षांनी लहान असलेल्या तिच्या  प्रियकरासोबत पळून गेली आहे. त्यांची सून स्वत: आजी झाली आहे, पण तिने आपल्या घरच्यांच्या सन्मानाचा विचार न करता हे पाऊल उचलले आहे. सून पळून गेल्यानंतर तिच्याशी खूप संपर्क साधण्यात आला पण तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांनी सांगितले की, तिचे यापूर्वी एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. आठ वर्षांपूर्वीही सून पळून गेली होती, मात्र नंतर ती घरी आली तेव्हा लोकांच्या लाजेमुळे तिला घरात ठेऊन घेतले. 

त्यांनी सांगितले की,   सुनेमुळे समाजात त्यांची अब्रु गेली आहे. आता सुनेला घरात घुसू देणार नाही. आता खूप झालंय. ती आता स्वत: आजी झाली होती. त्याची काळजी त्यांनी घ्यायला हवी होती. त्यानंतर त्यांनी बजरिया पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून या प्रकरणाचा तपास केला जात असल्याची माहिती बजरिया पोलिस ठाण्याचे प्रभारी यांनी दिली. महिला आणि तिच्या प्रियकराचा शोध घेतला जात आहे. ही बाब निदर्शनास आल्याचे बजरिया पोलिस ठाण्याचे प्रभारी यांनी सांगितले. महिलेच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली आहे. त्याआधारे महिला आणि तिच्या प्रियकराचा शोध घेतला जात आहे. लवकरच दोघांचा शोध घेऊन कारवाई केली जाईल.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर