Viral news : धावत्या बसमध्ये महिलेला आली उलटी; खिडकीतून डोके बाहेर काढताच शरीरापासून झाले वेगळे
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral news : धावत्या बसमध्ये महिलेला आली उलटी; खिडकीतून डोके बाहेर काढताच शरीरापासून झाले वेगळे

Viral news : धावत्या बसमध्ये महिलेला आली उलटी; खिडकीतून डोके बाहेर काढताच शरीरापासून झाले वेगळे

Jun 13, 2024 08:40 AM IST

Viral news : बिहारच्या गया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या बसमध्ये उलटी आल्याने डोके बाहेर काढल्याने एका भरधाव वाहनाची तिच्या डोक्याला जोरदार धडक बसल्याने महिलेचे डोके शरीरापासून वेगळे होऊन तिचा मृत्यू झाला आहे.

धावत्या बसमध्ये उलटी आल्याने डोके बाहेर काढल्याने एका भरधाव वाहनाची तिच्या डोक्याला जोरदार धडक बसल्याने महिलेचे डोके शरीरापासून वेगळे होऊन तिचा मृत्यू झाला आहे.
धावत्या बसमध्ये उलटी आल्याने डोके बाहेर काढल्याने एका भरधाव वाहनाची तिच्या डोक्याला जोरदार धडक बसल्याने महिलेचे डोके शरीरापासून वेगळे होऊन तिचा मृत्यू झाला आहे.

Viral news : गाडीत बसले असतांना डोके, हात बाहेर काढू नका असे आपल्याला नेहमी सांगितले जाते. असे केल्यास अपघात होण्याची शक्यता असते. मात्र, या नियमांकडे दुर्लक्ष करणे एका महिलेच्या जिवावर बेतले आहे. गया येथे एका बस मधून प्रवास करत असताना एका महिलेला उलटीचा त्रास झाला. तिने उलटी करण्यासाठी गाडीतून डोके बाहेर काढले असता एका भरधाव गाडीने दिलेल्या धडकेमुळे तिचे शिर धडापासून वेगळे होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी दुपारी पंचनपूर चौकाजवळ ही घटना घडली. सुमिंता देवी (वय ४८) असे मृत महिलेचे नाव असून ती अरवाल जिल्ह्यातील ओझा बिघा येथील रहिवासी रामरूप महतो यांची पत्नी आहे.

Vidhan Parishad Election 2024: शिक्षक-पदवीधर मतदारसंघासाठी ५५ उमेदवार रिंगणात, दिग्गजांची प्रतिष्ठा लागली पणाला!

आजारी असल्याने वैद्यकीय उपचार घेण्यासाठी ही महिला गोहहून गया येथे जात होती. ती एका बसमधून प्रवास करत होती. बस पंचनपूर बाजारपेठेत पोहोचताच महिलेला उलट्या होऊ लागल्या. यामुळे तिने खिडकीतून डोकं बाहेर काढलं. याच वेळी गयाकडून येणाऱ्या एका भरधाव वाहनाने महिलेच्या डोक्याला जोरदार धडक दिली. यामुळे तिचे शिर हे धडावेगळे झाले. महिलेचे रक्ताने माखलेले शरीर व डोकं नसल्यामुळे प्रवाशांचा थरकाप उडाला. प्रवासी किंचाळल्याने चालकाने बस थांबवली. बसमधील प्रवासी तातडीने खाली उतरले.

Pune Accident : पुण्यातील मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकात भरधाव ट्रकने महिलेला चिरडले; नागरिक संतप्त

या घटनेची माहिती मिळताच डायल ११२ चे पथक व पंचनपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मोठ्या प्रयत्नाने महिलेचा मृतदेह बसमधून बाहेर काढला. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. सुमिंता तिची लहान बहीण आणि बहिणीच्या मुलासह उपचारासाठी गया येथे डॉक्टरकडे जात होती. दरम्यान, ती एका भीषण अपघाताची बळी ठरली.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर लागणार वर्णी ? पक्ष उमेदवारी घोषित करण्याची शक्यता

शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. मगध मेडिकल पोलीस स्टेशन हद्दीतील गुलबिया चकाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. गुलबिया चक येथील राका असे १७ वर्षीय तरुणाचे नाव आहे. मगध मेडिकल स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवला.

दोन मोटारसायकलच्या जोरदार धडकेत या तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याचे मेडिकल स्टेशन प्रमुखांनी सांगितले. दुसरी घटना चांदौटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने लहानकी नवाडा येथील लक्ष कुमार यांचा जागीच मृत्यू झाला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर