मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  गॅसची बचत करण्यासाठी महिलेचा अजब जुगाड, Video पाहून डोक्याला लावाल हात

गॅसची बचत करण्यासाठी महिलेचा अजब जुगाड, Video पाहून डोक्याला लावाल हात

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 20, 2024 06:35 PM IST

Viral Video : एक महिला गॅस वाचवण्यासाठी अजब जुगाड करताना दिसत आहे. ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. व्हायरल व्हिडिओवर नेटीझन्स गंमतीशीर कंमेट करत आहेत.

गॅसची बचत करण्यासाठी महिलेचा अजब जुगाड
गॅसची बचत करण्यासाठी महिलेचा अजब जुगाड

Pressure Cooker Jugaad Video : जेव्हा गोष्ट पैसे वाचवण्यासाठी असते तेव्हा भारतीय महिलांचा हात कोणीच धरू शकत नाही. भाजीसोबत कोथिंबीरची जुडी मोफत मिळवण्याची ट्रीक महिलांना चांगल्या प्रकारे अवगत असते.घरातील सामान खरेदीपासून प्रत्येक छोट्या-मोठ्या वस्तूंमध्ये महिला काहीही करून पैसे वाचवताना दिसतात. मात्र अनेक वेळा पैशांची बचत करताना कंजुसीची मर्यादा ओलांडली जाते. जसे नुकत्याच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, एक महिला गॅस वाचवण्यासाठी अजब जुगाड करताना दिसत आहे. ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. व्हायरल व्हिडिओवर नेटीझन्स गंमतीशीर कंमेट करत आहेत.

व्हिडिओमध्ये एक मध्यम वयोगटातील महिलेचा व्हिडिओ पाहून काही जण तिचे कौतुक करत आहेत तर काही म्हणत आहेत की, इतक्या कंजूसपणाची काय गरज आहे. इंस्टाग्रामवर rekha_sharma.001 नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप पसंत पडत आहे. व्हिडिओमध्ये एक महिला किचनमध्ये जेवण बनवताना दिसत आहे. गॅस शेगडीवर एक कूकर (pressure cooker) ठेवला असून त्यामध्ये एक भाजी शिजत आहे. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा महिलेने कूकरचे झाकण काढून त्यावर कढई चढवली. कढईत तेल ओतून ते गरम होताच त्यात पुऱ्या तळायला घेतल्या.

 

तीन दिवसापूर्वी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ३ लाख २० हजारहून अधिक लोकांनी लाईक्स केल्या आहेत. यावर अनेक युझर्स रिएक्शन देत आहेत. एका यूजरने लिहिले की, अरे दीदी इतकीही बचत करू नका, दूसऱ्या यूजरने लिहिले आहे की, खरे सांगा तेल आधीच गरम करून मग ते कूकरवर ठेवले आहे ना, तिसऱ्या यूजरने लिहिले की, कूकरच्या प्रेशरने जर कढई उडाली तर तुमचे काय होईल. अन्य एका यूजरने लिहिले, हे पार्थ रथला खोल दरीकडे घेऊन चल.

WhatsApp channel

विभाग