Viral News: मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील एका तरुणीचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. संबंधित तरुणी चक्क गर्दीच्या ठिकाणी ब्रा घालून फिरताना दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. मात्र, या तरुणीने अनेक मुली असे कपडे घालतात, मी त्यापेक्षा काही वेगळे केलेले नाही, मला काही प्रॉब्लेम नाही, ज्यांना असेल त्यांनी मला भेटू शकतात, असे म्हटले.
नेटकऱ्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना तरुणी म्हणाली की, मी बातम्यांमध्ये झळकत आहे, कारण त्यांना व्ह्यूज हवे आहेत. मला वाटते मी आणखी चॅनल्सवर दिसेल. आता आठवडाभर असेच सुरू राहणार. मला त्याच्याशी काही घेणे- देणे नाही. जर कोणाला माझ्याविरोधात तक्रार दाखल करायची असेल तर, त्यांना माझ्या घराचा पत्ता द्या.' मात्र, त्यानंतर हे प्रकरण चिघरळे.
खासदार कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, 'ही बाब माझ्याही लक्षात आली . याविरोधात काही महिला संघटना पोलीस आयुक्तांना निवेदन देणार आहेत. इंदूर हे सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे. इंदूरमध्ये अशा अश्लीलतेला स्थान नाही. प्रत्येकाला कपडे घालण्याची, खाण्याची, पिण्याची मुभा आहे, पण हा मूलभूत अधिकारांचा गैरवापर होता कामा नये. प्रशासनाने कारवाई करावी आणि समाजाने अशा लोकांवर बहिष्कार टाकावा.'
इंदोर शहरातील अनेक संघटनांनी या विरोधात आवाज उठवत तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एका तरुणीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती मिळाली. काही संघटनांनी या तरुणीवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदनही दिले. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.’
दरम्यान, तरुणीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात ती लोकांची माफी मागत आहे. ‘सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माझ्या व्हिडिओ मी तोकडे कपडे घातले आहेत. माझ्याकडून चूक झाली. मी सार्वजनिक ठिकाणी असे कपडे घालायला नको होते. या व्हिडिओंमुळे ज्यांची मने दुखावली गेली, त्या सर्वांची मी माफी मागते. मी पुन्हा असे करणार नाही. मी यापुढे सार्वजनिक ठिकाणी असे कपडे घालणार नाही.’
पीटीआयच्या वृत्तानुसार, तरुणीने सोशल मीडियावर असा दावा केला आहे की, ती दुबईत राहते. पोलीस उपायुक्त हंसराज सिंह यांनी सांगितले की, पोलिसांनी महिलेच्या माफीचा ताजा व्हिडिओही पाहिला आहे. सार्वजनिक ठिकाणी छोटे कपडे घालून फिरण्यामागे त्या तरुणीचा हेतू काय होता? कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत करून योग्य ती कारवाई करू.