Woman tv anchor eats fly : सोशल मीडियावरएका महिला न्यूज अँकरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये दिसते की, लाईव्ह टेलिकास्टच्या दरम्यान महिलेच्या तोंडात माशी जाते व महिला चुकीने ती माशी गिळते. हा व्हिडिओ बॉस्टन२५न्यूज च्या अँकरचा आहे. स्कायन्यूजच्या रिपोर्टनुसार,महिला अँकर वैनेसा वेल्च मागील आठवड्यात न्यूजकास्टला होस्ट करत होती. त्यावेळी एक माशी तिच्या भुवयांवर बसते. तिला काही समजेपर्यंत माशी भुवयांवरून पडून थेट तिच्या तोंडात जाते. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ कॅमऱ्यात कैद झाला आहे. सोशल मीडियावर ही क्लिप व्हायरल होत आहे.
सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओत दिसते की, महिलेने माशी गिळली आहे. मात्र तिने कमालीची व्यावसायिकता दाखवून अँकरिंग थांबवली नाही. काही यूजर्सने अँकरिंग न थांबवता आपले काम तसेच सुरू ठेवल्याने महिला अँकरचे कौतुक केले आहे. एका यूजरने कमेंट केले आहे की, महिला खूपच प्रोफेशनल आहे. तिने कोणतीच चुकीची रिएक्शन दिली नाही किंवा तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती दिसली नाही. जर तिच्याजागी दुसरे कोणी असते तर जी व्यावसायिकता महिलेने दाखवली तसे करू शकला नसता.
अन्य एका यूजरने लिहिले की, बिचारी महिला. हीच आहे प्रोफेशनची नैतिकता. चांगली व वाईट दोन्ही एकत्रच असते. अन्य एका व्यक्तीने म्हटले की, या महिलेच्या वेतनात वाढ केली पाहिजे. तिने तर आपल्या पापण्या एकदाही मिचकावल्या नाहीत. खूपच अधिक प्रोफेशनलिज्म दाखवला.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूपच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इंस्टाग्राम आणि एक्सवरील अनेक अकाउंट्सवरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. इंस्टाग्रामवर एका पेज द्वारे शेअर केल्या गेलेल्या व्हिडिओला अडीच लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. दरम्यान काही लोकांचे म्हणणे आहे की, महिला अँकरच्या डोळ्यावर काहीतरी लावले होते. ते खाली पडले. मात्र व्हिडिओ पाहून समजते की, दुसरे तिसरे काही नसून माशीच आहे.