सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. असे अनेक व्हिडिओ समोर येतात जे तुम्ही कधीही पाहिले नसतील. हे पाहून लोक थक्क होतात. त्याचबरोबर अनेक गंमतीशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यातील काही घटना नकळतपणे शूट करून सोशल मीडियावर शेअर केल्या जातात. त्यापैकी काही घटना थरारक असतात,तर काही व्हिडिओ पाहून हसू आवरत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला असं काही करत आहे, जे पाहून तुम्ही कपाळावर हात मारून घ्याल.
बस कशीही असो. प्रत्येक बसमध्ये चढण्याची पद्धत एकसारखीच असते. प्रत्येक बसला एक दरवाजा असतो त्यातून लोक बसमध्ये चढत-उतरत असतात. काही बसेसमध्ये दोन-दोन दरवाजे असतात. त्यातील एकातून बसमध्ये चढता येते तर दुसऱ्यातून उतरायचे असते. मात्र व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील दृष्यच वेगळे आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, बसस्थानकावर उभ्या असलेल्या बसमध्ये चढण्यासाठी लोकांची गर्दी झाली असून बसमध्ये चढण्यासाठी चढाओढ सुरू आहे. यावेळी एक महिला चक्क बसच्या मागच्या खिडकीतून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहे. या महिलेचं हे धाडस पाहून अनेक जण आश्चर्य करत आहेत. महिला बसच्या खिडकीतून जवळपास आत गेली आहे तर दुसरी त्याचपद्धतीने चढण्याच्या प्रयत्नात आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @Ghar Ke Kalesh या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्यूज आणि एक हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.
व्हिडिओ पाहून एका यूजरने लिहिले की, काही तरी मजबूरी असले. दुसऱ्याने लिहिले की, जागा मिळवण्याची धडपड आहे. तिसऱ्या यूजरने लिहिले की, देवा हे काय पाहायला मिळत आहे. अन्य एकाने लिहिले की, ही बाई नाही सुपर बाई आहे. तसेच एकाने लिहिले अरे ही जरा वेडी आहे का?”
दरम्यान, यापूर्वी देखील खिडकीतून बसमध्ये चढण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एक वृद्ध व्यक्तीही बसच्या खिडकीतून चढताना दिसले होते.