मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  धोकेबाज प्रियकराचा महिलेने घेतला बदला, ८३ लाखाचे बक्षीसही मिळवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

धोकेबाज प्रियकराचा महिलेने घेतला बदला, ८३ लाखाचे बक्षीसही मिळवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 05, 2024 03:01 PM IST

Viral News : एका महिलेने प्रेमात धोका दिलेल्या प्रियकराला चांगलाच धडा शिकवला असून तिने त्याच्या करचोरीची माहिती आयकर विभागाला देऊन बक्षीसही मिळवले.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

एका अमेरिकन महिलेने आपल्या धोकेबाज एक्स बॉयफ्रेंडला धडा शिकवण्यासाठी अजब शक्कल लढवली आहे. महिलेने आयकर विभागात आपल्या माजी प्रियकराची तक्रार केली की, त्याने पगारावर कर भरलेला नाही. एवा लुईस नावाच्या एका मॉडेलने नुकताच एक टिकटॉक  व्हिडिओ  पोस्ट केला आहे, त्यामध्ये म्हटले आहे की, कशा पद्धतीने तिने प्रेमात धोका दिलेल्या माजी प्रियकराचा बजला घेतला व या कामासाठी तिला बक्षीसही मिळाले.

एका टिकटॉक व्हिडियोमध्ये अवाने म्हटले की, तिने महसूल सेवा (आयआरएस) ला आपल्या माजी प्रियकराने कर चोरी केल्याची सूचना दिली व व्हिसलब्लोअर पुरस्कार जिंकला. ज्याची किंमत १००,००० डॉलर म्हणजे जवळपास ८३ लाख रुपये आहे. महिलेने आपल्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तिने म्हटले की, माझा बॉयफ्रेंड माझ्याबरोबर होता, त्यावेळी त्याने कधीही कर भरला नाही. त्यानंतर त्याने मला धोका दिला. काही महिन्यानंतर त्याच्या करचोरीची तक्रार मी आयआरएसकडे केली व बक्षीस मिळवले. मी ते पैसे रोज खर्च करत आहे. तर तो तुरुंगाची हवा खात आहे.

हा टिकटॉक व्हिडिओ आतापर्यंत ३.८ मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अनेक लोकांनी महिलेचे कौतुक केले आहे. आयआरएस व्हिसलब्लोअर कार्यालय अशा लोकांना पुरस्कृत करते जे टॅक्स चोरी करण्याची सूचना देते. सामान्यपणे वसूल करण्यात आलेल्या रक्कमेच्या १५ ते ३० टक्के रक्कम व्हिसलब्लोअरला देण्यात येते. 

WhatsApp channel

विभाग