मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  झाला ना पचका ! ऑफिसमधून इमर्जन्सी सुट्टी घेऊन IPL सामना पाहायला गेली महिला, बॉसने टीव्हीवर पाहिले, अन्..

झाला ना पचका ! ऑफिसमधून इमर्जन्सी सुट्टी घेऊन IPL सामना पाहायला गेली महिला, बॉसने टीव्हीवर पाहिले, अन्..

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 09, 2024 06:55 PM IST

IPL Matches : एक महिला ऑफिसमध्ये फॅमिली इमर्जन्सी सांगून लवकर निघून गेली. त्यानंतर ती थेट आयपीएल सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली. तेथे कॅमरामनने महिलेवर फोकस केला अन् ऑफिसमध्ये बसलेल्या बॉसने हे पाहिले.

ऑफिसमधून इमर्जन्सी सुट्टी घेऊन  IPL सामना पाहायला गेली महिला
ऑफिसमधून इमर्जन्सी सुट्टी घेऊन  IPL सामना पाहायला गेली महिला

देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीसोबतच इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा फिवर सुरू झाला आहे.आयपीएलचे सामने पाहणे क्रिकेटरसिकांसाठी पर्वणीच असते. क्रिकेटचे चाहते आयपीएलचा एकही सामना सोडत नाहीत. चाहते आपल्या आवडीच्या क्रिकेटपटूंना प्रत्यक्ष पाहण्यासाठी काहीही करून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करतात व संधी मिळतात सामना पाहायला स्टेडियममध्ये पोहोचतात. आपल्या आवडीच्या टीमला व क्रिकेटपटूला स्टेडिअममध्ये जाऊन सपोर्ट करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे बहाणे बनवत असतात. अशाच एका महिला क्रिकेट चाहतीने रॉयल चँलेंजर्स बेंगळुरु आणि लखनौ सुपर जॉयन्ट्स संघातील सामना पाहण्यासाठी ऑफिसमधून लवकर कलटी मारली. तिने बॉसला सांगितले की, कुटूंबात काही तरी इमर्जन्सी आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ऑफिसमधून काहीतरी बहाणा बनवून ती स्टेडिअममध्ये तर पोहोचली मात्र योगायोगाने कॅमरामनने त्या महिलेवर फोकस केला. ऑफिसमध्ये टीव्हीवर सामना पाहात असलेल्या बॉसने तिला पाहिले. पहिल्यांदा त्यांना विश्वास बसला नाही की, ती त्यांची कर्मचारी असेल, मात्र कॅमेरा उशिरपर्यंत तिच्यावरच झूम राहिल्याने बॉसला पक्का विश्वास पटला की, ती श्रीमती द्विवेदीच आहे. बॉसने ही सुद्धा माहिती काढली की, तिची फेव्हरेट टीम बेंगळुरु आहे.

महिलेने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत संपूर्ण घटना सांगितली आहे. तिने सांगितले की, ऑफिसमध्ये फॅमिली इमर्जन्सी सांगून आयपीएल पाहायला गेली होते. त्यानंतर कॅमरामनने फोकस केला आणि मी टीव्हीवर दिसू लागले. बॉसने पाहिल्यावर त्यांच्याशी काही अशा प्रकारे बातचीत झाली.

महिलेच्या या पोस्टवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, बॉसने कमीत कमी काही खासगी क्षण घालवण्यासाठी वेळ दिला पाहिजे. एका अन्य यूजरने म्हटले की, स्टेडिअममध्ये खूप लोक प्रतीक्षा करतात की, कॅमरामन त्यांच्यावर फोकस करेल. मात्र ही महिला फोकस केल्यानंतर अडचणीत सापडली आहे. या सामन्यातही बंगळुरूला लखनौकडून पराभव पत्करावा लागला होता.

क्विंटन डी कॉकची नव्या विक्रमाला गवसणी -

आयपीएलच्या २०२४ च्या हंगामात लखनौ सुपर जायंट्सचा स्टार फलंदाज क्विंटन डी कॉकने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात जबरदस्त फलंदाजी केली. या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून पाहुण्यांना फलंदाजीचे आमंत्रण दिल्यानंतर लखनौसाठी फलंदाजीसाठी आलेल्या क्विंटन डी कॉक वादळी अर्धशतक झळकावून नव्या विक्रमाला गवसणी घातली.

IPL_Entry_Point

विभाग