मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  धक्कादायक! डॉक्टर महिलेने पोटच्या चार वर्षीय मुलीला चौथ्या मजल्यावरून खाली फेकले
डॉक्टरमहिलेने पोटच्या चार वर्षीय मुलीला चौथ्या मजल्यावरून खाली फेकले
डॉक्टरमहिलेने पोटच्या चार वर्षीय मुलीला चौथ्या मजल्यावरून खाली फेकले
05 August 2022, 20:26 ISTShrikant Ashok Londhe
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
05 August 2022, 20:26 IST
  • एका महिलेने आपल्या चार वर्षांच्या गतिमंद मुलीला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे आरोपी महिला ही डॉक्टर आहे.

बंगळुरू - मातृत्त्वाला काळीमा फासणारी घटना कर्नाटकातील बंगळुरूमधून समोर आली आहे. येथे एका घटनेत एका महिलेने आपल्या चार वर्षांच्या गतिमंद मुलीला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे आरोपी महिला ही डॉक्टर आहे. ती दंतचिकित्सक असल्याची माहिती आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

उच्च शिक्षित असूनही आपले मूल ज्याला बोलताही येत नाही ते आपल्या करिअरमध्ये आणि प्रगतीमध्ये अडथळा ठरत आहे असल्याचे वाटून तिने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले. 

या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यातील फुटेजमध्ये आरोपी तिच्या मुलीसोबत बाल्कनीत उभी असलेली दिसते. त्यानंतर काही वेळात ती आपल्या बाळाला खाली फेकताना दिसत आहे. सुषमा भारद्वाज असे आरोपी महिलेचे नाव असून तिने आपल्या मुलीला फेकून देऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु शेजाऱ्यांनी तिला रोखले.

बंगळुरूमधील सन्पंगीराम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी ही घटना घडली. या घटनेतील आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. सुषमाला तिचा पती किरणने केलेल्या तक्रारीनंतर अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

विशेष म्हणजे यापूर्वीही सुषमा यांनी आपल्या मुलीला रेल्वे स्टेशनवर सोडून देण्याचा प्रयत्न केला होता. 

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग