Viral Video: एअर इंडियाच्या विमानात महिलेनं केलं असं काही, सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलवून तिला काढलं बाहेर!-woman thrown off air india express bengaluru flight x user claims she abused crew video viral ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: एअर इंडियाच्या विमानात महिलेनं केलं असं काही, सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलवून तिला काढलं बाहेर!

Viral Video: एअर इंडियाच्या विमानात महिलेनं केलं असं काही, सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलवून तिला काढलं बाहेर!

Oct 01, 2024 12:02 PM IST

Air India Viral Video: एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या महिलेला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बाहेर काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ: एअर इंडियाच्या विमानातून महिलेला काढलं बाहेर, कारण काय?
व्हायरल व्हिडिओ: एअर इंडियाच्या विमानातून महिलेला काढलं बाहेर, कारण काय? (X/ @_being_Rajasthani )

Viral News: एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानातून एका अज्ञात महिलेला खाली उतरवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही घटना घडली तेव्हा सुरतहून बंगळुरूला जाणाऱ्या विमानात घडली. एका प्रवाशाने रेकॉर्ड केलेल्या या व्हिडिओमध्ये दोन महिला सुरक्षा कर्मचारी महिलेला हाताने ओढताना दिसत आहेत. या महिलेने इतर प्रवाशासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला जात आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

व्हायरल व्हिडिओत संबंधित महिला काय बोलत आहे, हे समजणे कठीण आहे. परंतु सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिला विमानातून खाली उतरवण्यापूर्वी ती रडताना आणि ओरडताना दिसत आहे. तिला खाली उतरविल्यानंतरही सुरक्षा अधिकारी तिला शांत करण्याचा प्रयत्न करता. ही महिला आपल्या सीटबद्दल काहीतरी बडबडते, पण ती जे काही बोलत आहे, ते व्हिडिओत व्यवस्थित ऐकू येत नाही.

व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीनेच हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, 'महिलेने एका प्रवाशाला धक्का बुक्की केली. त्यानंतर मधस्ती करणाऱ्या केबिन क्रूलाही शिवीगाळ केली. यामुळे तिला विमानातून खाली उतरवण्यात आले.' विमानात झालेल्या या हाय व्हॉल्टेज ड्रामामुळे विमानाला १ तास उशीर झाल्याशी माहिती समोर येत आहे.

या व्हिडिओला काही वेळातच पाच लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, ‘विमानात असे काय घडले? ज्यामुळे महिलेला जबरदस्तीने विमानातून खाली उतरवण्यात आले.’ दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘या महिलेने क्रू मेंबरसोबत काहीतरी चुकीचे केले असावे.’ तिसऱ्या युजने म्हटले आहे की, काही लोकांना मुद्दाम वाद घालण्याची सवय असते, मग ते घरी असो किंवा घराबाहेर.'

याआधी एअर इंडियाच्या विमानातून प्रवाश करताना एका महिला पत्रकाराला दिलेल्या ऑम्लेटमध्ये झुरळ आढळून आल्याचा  प्रकार समोर आला होता. महिला पत्रकाराने स्वत: या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून शेअर केला होता. ऑम्लेट खाल्ल्यानंतर तब्येत बिघडल्याचेही त्यांनी दावा केला. या घटनेची एअर इंडियाने दखल घेतली असून संबंधित महिला पत्रकाराची माफी मागितली आणि यापुढे असा प्रकार घडू नये म्हणून दोषींविरोधात कडक पाऊल उचलले जाईल, अशीही ग्वाही दिली.

Whats_app_banner
विभाग