आजकाल आपण सर्वजण सोशल मीडियाच्या जगात वावरत आहोत. आजच्या काळात कंटेंट क्रिएटर्स व्हायरल होण्यासाठी काहीही करण्यासाठी तसेच कोणत्याही थराला जाण्यासाठी तयार असतात. जीवघेण्या कार-बाईक स्टंट्सपासून पिस्तुल घेऊन डान्स करणे आता सामान्य झाले आहे. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून नेटीझन्स भडकले आहेत. या क्लिपमध्ये एक महिला नवजात बालकाला कडेवर घेऊन धुम्रपान करताना दिसत आहे. व्हिडिओ सुरू होताच महिला आपला चेहरा कॅमेऱ्याकडे करते. तिच्या हातात सिगरेट असून ती सिगरेटचे झुरके घेत तोंडातून धूर सोडत आहे.
व्हायरल व्हिडिओत दिसते की, एका महिलेने आपल्या उजव्या हातात लहान बाळ पकडलं आहे. तर तिच्या दुसऱ्या हातात पेटती सिगरेट आहे. सिगरेटचा झुरका मारल्यानंतर ती मुलासमोरच तोंडातून धूर सोडते. या व्हिडिओच्या बॅकराऊंडला एक हिंदी गाणंही लावण्यात आलं आहे. या गाण्यावर ती महिला रिल बनवत आहे.
चिमुकल्या मुलाला सिगरेटच्या धुराचा वास सहन होत नाही व तो खोकायला लागते. असे वाटते की, मुलाला श्वास घेण्यास त्रास होत आहे. हा व्हिडिओ पाहून इंटरनेट यूजर्स भडकले आहेत. व्हिडिओत दिसत असलेल्या महिलेविषयी लोकांनी राग व्यक्त केला आहे. दीपिका नारायण भारद्वाज नावाच्या एक्स यूजरने ही क्लिप शेयर करताना लिहिले की, मुलासाठी खूप वाईट वाटत आहे, त्याच्याजवळ हारील राक्षस आहे. त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटले की, व्हिडिओत दिसत असलेले बाळ या महिलेचे नाही. मी तिची टाइम लाइन पाहिली मात्र अन्य कोणत्याही रीलमध्ये बाळ दिसले नाही. रील बनवण्यासाठी तिने दुसऱ्या कोणाचे तरी बाळ घेतले असावे.
व्हिडिओ पाहून लोकांचा संताप -
सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ ८ लाखाहून अधिक वेळा पाहण्यात आला आहे. एका यूजरने यावर कमेंट केली आहे की, ही महिला मानसिक दृष्ट्या आजारी असून तिच्याविरोधात बाल शोषणाचा गुन्हा दाखल करायला हवा. दुसऱ्या यूजरने कमेंट केली आहे की, मला असे वाटते की, मूल तिचे नाही.तिला बाळाला पकडायलाही येत नाही.बाळ तिच्याजवळ सुरक्षित वाटत नाही. मला आशा आहे की, आई-वडील आपल्या बाळाला अशा बेजबाबदार व्यक्तींपासून दूर ठेवतील. त्याचप्रमाणे अनेक लोकांनी महिलेवर आगपाखड केली आहे. तसेच तिच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
संबंधित बातम्या