Viral News: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कधी काय व्हायरल होईल? हे सांगता येत नाही. दररोज, सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंख्य व्हिडिओ पोस्ट केले जातात. परंतु, यातील काही मोजकेच व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात एक महिला बाईकखाली दबलेल्या आपल्या पतीला कसे वाचवते, हे पाहायला मिळत आहे.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसत आहे की, एका घराबाहेर बाईक उभी आहे. तितक्यात एक व्यक्ती तिथे पोहोचतो आणि आपली ताकद दाखवण्यासाठी बाईक उचलण्याचा प्रचत्न करतो. मात्र, हा प्रयत्न त्याच्या अंगलट येतो आणि तो बाईकखाली दबतो. तो आपल्या अंगावर पडलेली बाईक बाजूला करण्याचा अनेकदा करतो. परंतु, तो अपयशी ठरतो. हे समजल्यानंतर तिथे एक महिला येते आणि ती बाईक बाजूला करून त्या व्यक्तीला बाहेर काढते. त्यामुळेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
himachali_here नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'डेंजर्स पॉवर' असे लिहिले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत २ लाखांपेक्षा अधिक लोकांनी लाईक केले आहे. तर, हजारो लोकांनी या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, असे करण्याची काय गरज होती. दुसऱ्या युजरने महिलेचे कौतूक करत असे म्हटले आहे की, 'बाहुबली वहिनीमुळे भावाचा जीव वाचला.' तिसऱ्या युजरने तिचा उल्लेख बाहुबली चित्रपटातील देवसेना असे केला आहे. देवसेनेने त्याला वाचवले असे त्याने म्हटले आहे. आणखी एका युजरने अशी कमेंट केली आहे की, 'हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ माझ्या गावातील आहे, संबंधित व्यक्तीच्या वतीने मी माफी मागतो.'
सोशल मीडियावर कमी वेळात अधिक प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक कुठल्या थराला जातील, याचा नेम नाही. अनेकजण धोकादायक स्टंटबाजी करून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, असे करणे अनेकांच्या अंगलट आले आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यात ती गाडी चालवत असताना रील बनवण्याचा प्रयत्न करते. परंतु, गाडी रिव्हर्स गिअरमध्ये असल्याने आणि तरुणीचा ब्रेकऐवजी एक्सीलेटरवर पाय पडल्याने तरुणी गाडीसह दरीत कोसळते. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला.