IAS Tina Dabi Surprised With Woman Sarpanch Fluent English: आयपीएस अधिकारी टीना दाबी आपल्या कामाच्या पद्धतीमुळे नेहमीच चर्चेत असतात. २०१५ साली यूपीएससी परीक्षेत टॉपर राहिलेल्या टीना दाबी नुकत्याच नुकत्याच प्रसूती रजेवरून परतल्या आहेत. यावेळी त्यांच्याकडे बारमेर जिल्ह्याची कमान देण्यात आली. टीना दाबी यांची खासियत म्हणजे त्या आपल्या जिल्ह्यातील लोकांच्या संपर्कात राहतात. सध्या सोशल मीडियावर टीना दाबी यांच्या संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत खेडेगावातील एक सरपंच महिला मंजावर उभी राहून गावकऱ्यांना संबोधित करत आहे. मात्र, ही महिला हिंदी किंवा इतर भाषेत न बोलता अस्खलित इंग्रजीत भाषण करते, हे पाहून मंचावर उपस्थित असलेल्या टीना दाबी देखील आश्चर्यचकीत होतात.
व्हिडिओत दिसत आहे की, सोनू कंवर असे संबंधित महिलेचे नाव असून त्या राजस्थानमधील जालपा येथील सरपंच आहेत. कंवर या स्टेजवर येताच इंग्रजीत बोलायला सुरूवात करतात. महिला संरपंचाचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व पाहून टीना दाबी यांच्यासह अनेकजण आश्चर्यचकीत होतात. महिला सरपंच यांनी इंग्रजीत भाषण करताना म्हटले की, 'या दिवसाचा भाग बनून मला आनंद झाला. सर्वप्रथम मी आमच्या जिल्हाधिकारी टीना मॅडम यांचे स्वागत करते.' या महिलेचे अस्खलित इंग्रजी ऐकून टीना दाबी या हसू लागतात.
@KailashSodha_94 या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये टीना दाबी या स्टेजवर बसल्या असून महिला सरपंच भाषण करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, बाडमेर येथे आयएस अधिकारी टीना दाबी यांच्यासमोर एका महिला सरपंचने इंग्रजीत भाषण केल्यानंतर सगळेच आश्चर्यचकीत झाले. एवढेच नव्हेतर टीना दाबी या देखील हसायला लागल्या.
आयएएस टीना दाबी यांची नुकतीच बारमेर येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. याआधी त्या जैसलमेरच्या जिल्हाधिकारी होत्या. त्यांचे पती आयएएस प्रदीप गावंडे यांना जालोरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते, जे बाडमेरपासून १५० किमी अंतरावर आहे.