Viral Video: कुत्र्यांच्या पिल्लांसोबत महिलेचं धक्कादायक कृत्य; व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: कुत्र्यांच्या पिल्लांसोबत महिलेचं धक्कादायक कृत्य; व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले!

Viral Video: कुत्र्यांच्या पिल्लांसोबत महिलेचं धक्कादायक कृत्य; व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले!

Jun 05, 2024 04:05 PM IST

Puppies Viral Video: याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह दोन जणांना अटक करण्यात आली.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. (AP)

Viral News: सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात ती कुत्र्यांच्या पिल्लांना कचरापेटीत फेकताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी संबंधित महिला आणि तिच्यासोबत असलेल्या एका पुरुषाची ओळख पटवून त्यांना अटक केली.

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, एक महिला तिच्या हातात असलेल्या कुत्र्यांच्या पिल्लाला कचरापेटीत फेकते. त्यानंतर दुसऱ्या कुत्र्याला पिल्लाला उचलून त्याच कचरापेटीत फेकते.  हा संपूर्ण प्रकार जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होतो.

डब्ल्यूबीआरझेडने दिलेल्या माहितीनुसार, जॅस्मिन माउंटन आणि केंडल टायलर अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. फुटेज व्हायरल झाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. कुत्र्यांना कचरापेटीत टाकताना पाहून शेजाऱ्याने त्यांची सुटका केली. ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

हा व्हिडिओ शेअर झाल्यापासून अनेक लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही हा व्हिडिओ पुन्हा शेअर केला जात आहे. एका फेसबुक युजरने लिहिलं आहे की, 'अशा क्रूरतेसाठी कृपया कडक दंड करा.'

कुत्र्यानं प्रवाशांना धावत्या रेल्वेतून उतरताना रोखलं, व्हिडिओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर कुत्र्याचा एक अप्रतिम व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही त्याचे कौतुक करण्यापासून स्वतःला थांबवू शकणार नाही. खरंतर, या व्हिडिओमध्ये एक कुत्रा रेल्वे स्टेशनवर असे काही करताना दिसत आहे, जे खरोखरच आश्चर्यकारक आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनजवळ एक कुत्रा दिसत आहे. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, लोक चालत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करतात, जे खूप जीवघेणे असते. चालत्या ट्रेनमधून उतरणे किती धोकादायक आहे हे माहीत असूनही लोक त्यांच्या कृतीपासून परावृत्त होत नाहीत. मात्र, हा कुत्रा दरवाजाजवळ बसलेल्या नागरिकांना सावध करण्याचा आणि धावत्या ट्रेनमधून खाली न उतरण्याचा सल्ला देत असल्याचे या व्हिडिओतून दिसते. कुत्र्याचा हा व्हिडिओ पाहून नेटकरी भरावून गेले.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर