लग्न ठरल्यानंतर फिरायला गेलेल्या तरुणीवर होणाऱ्या पतीनं केला बलात्कार, ८ ठिकाणी चावे घेतले! मित्रांनाही बोलावलं!-woman raped by finance in rishikesh assaulted by his friends ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  लग्न ठरल्यानंतर फिरायला गेलेल्या तरुणीवर होणाऱ्या पतीनं केला बलात्कार, ८ ठिकाणी चावे घेतले! मित्रांनाही बोलावलं!

लग्न ठरल्यानंतर फिरायला गेलेल्या तरुणीवर होणाऱ्या पतीनं केला बलात्कार, ८ ठिकाणी चावे घेतले! मित्रांनाही बोलावलं!

Sep 01, 2024 03:08 PM IST

ghaziabad rape : उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका लग्न ठरलेल्या तरुणीवर तिच्याच होणाऱ्या नवऱ्याने बलात्कार केला. ऐवढंच नाही तर त्यानंतर मित्रांना देखील बोलावून तीने तिच्यावर अत्याचर केला.

लग्न ठरलेल्या मुलीवर होणाऱ्या पतीनं ८ ठिकाणी चावे घेऊन केला पाशवी बलात्कार! मित्रांनाही बोलवलं
लग्न ठरलेल्या मुलीवर होणाऱ्या पतीनं ८ ठिकाणी चावे घेऊन केला पाशवी बलात्कार! मित्रांनाही बोलवलं

ghaziabad fiance rape : देशात महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली आहे. कोलकाता, बदलापूर येथील घटना ताजी असतांना आता उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे एक हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. एका मुलीचा साखरपुडा झाला. ती होणाऱ्या नवऱ्यासोबत ऋषिकेश येथे  फिरायला गेली असता, त्याने हॉटेल रूममध्ये तिच्यावर पाशवी बलात्कार केला. तिच्या अंगावर आठ ठिकाणी चावला व तिला गंभीर मारहाण केली. यानंतर त्याने त्यांच्या मित्रांना देखील फोन करून बोलावून घेतलं. त्याच्या मित्रांनीही तरुणीवर अत्याचार  केला.

अंशू चौधरी असे आरोपीचे नाव आहे. त्याने त्याच्या होणाऱ्या बायकोवर अत्याचार केले आहे. आरोपीने होणाऱ्या पत्नीला ऋषिकेश फिरायला नेले. त्याठिकाणी अंशु चौधरीने त्याच्या होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला. ऐवढेच नाही तर मित्रांनाही तिच्यावर अत्याचार करायला लावला. अंशू चौधरी याच्या सोबत इतर आरोपी आदित्य कपूर, यश उंजाल, मुस्ताफा या तिघांना देखील अटक करण्यात आली आहे.

नराधम आठ ठिकाणी चावला

या प्रकरणी एका २२ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. तिने दिलेल्या माहितीनुसार तिचा अंशु चौधरीबरोबर साखरपुडा झाला होता. त्यानं तिला लग्न ठरल्यानंतर एकत्र फिरायला जाऊ असं म्हटलं व तिला ऋषिकेशला घेऊन आला. दोघांनी हॉटेलमधील रुममध्ये प्रवेश केल्यानंतर अंशुने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. तिच्या अंगावर त्याने आठ ठिकाणी चावे घेतले. यामुळे तिला वेदना होत असतांना देखील नराधम धांबला नाही व छळ करत राहिला. यानंतर त्याने त्याच्या मित्रांना देखील बोलावून तिच्यावर अत्याचार केले. या घटनेनंतर पीडिता जेव्हा तिच्या घरी आली तेव्हा तिने तिच्या आईला घडला प्रकार सांगितला. ज्यानंतर आईने पोलिसात धाव घेतली.

गाझियाबादचे पोलीस उपायुक्त राकेश कुमार यांनी या प्रकरणी माहिती दिली. या तरुणीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिच्यावर अत्याचार झाल्याचं सिद्ध झालं आहे. ही घटना २१ ऑगस्ट रोजी घडला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे दोघे एकत्रच गाझीयाबादला परत आले. यावेळी ते वाटेत थांबले. व आरोपीने त्याच्या मित्रांना बोलावून या तरुणीवर पुन्हा छळ केला.

पीडित मुलीच्या आईने दिली तक्रार

या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने २४ ऑगस्ट रोजी तक्रार दिली. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. आरोपींनी मुलीची छेड काढून तिला गाझियाबाद पेट्रोल पंपवर सोडून दिल्याचं तिने दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेत आरोपीना अटक केली आहे.

विभाग