Baby Viral Video: फोनच्या नादात एका महिलेने भाजी ऐवजी बाळालाच फ्रीजमध्ये ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना नेमके कोणत्या ठिकाणी घडली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. एखादी महिला फोनच्या नादात आपल्या मुलाला फ्रीजमध्ये कसे ठेऊ शकते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या मुलासह दिसते. महिला फोनवर बोलताना भाजी कापत आहे. भाजी कापल्यानंतर थोड्यावेळाने फ्रीज जवळ जाते. त्यानंतर भाजीऐवजी बाळालाच फ्रीजमध्ये ठेवते. काही वेळाने आतल्या खोलीतून महिलेचा नवरा येतो आणि बाळाला शोधतो. पण त्याला बाळ कुठेच दिसत नाही. फ्रीजजवळ गेल्यानंतर त्याला रडण्याचा आवाज ऐकू येतो. फ्रीजचा दरवाजा उघडल्यावर बाळ आत असल्याचे दिसून येते.
बाळाला फ्रीजमध्ये पाहून महिलेच्या नवऱ्याला धक्काच बसला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. फोनच्या व्यसन एखाद्या व्यक्तीसाठी किती घातक ठरू शकतो, हे या व्हिडिओतून दिसून येते.
संबंधित बातम्या