मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bhiwani Crime News : महिला कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं; धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Bhiwani Crime News : महिला कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं; धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 29, 2023 02:11 PM IST

Bhiwani Crime News : प्रजासत्ताक दिनी प्रशासनानं पुरस्कार देत आरोपी महिला कर्मचाऱ्याचा गौरव केला होता. त्यानंतर आता लाचखोरीच्या प्रकरणात महिलेला अटक करण्यात आली आहे.

Bhiwani Haryana Crime News Marathi
Bhiwani Haryana Crime News Marathi (HT_PRINT)

Bhiwani Haryana Crime News Marathi : दाखल झालेला गुन्ह्यात दिलासा देण्यासाठी एका व्यक्तीकडून महिला पोलीस अधिकाऱ्यानं चक्क पाच हजार रुपयांची घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हरयाणातील भिवानी जिल्ह्यात ही घटना घडली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुन्नी देवी असं आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून तिला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळं आता या प्रकरणामुळं संताप व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच यूपीत एका पोलीस अधिकाऱ्याला लाचखोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता हरयाणात महिला पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्यामुळं खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरयाणाच्या भिवानी जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात आरोपी मुन्नी देवी या काम करतात. याच पोलीस ठाण्यात परिसरातील एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी हा गुन्हा मागे घेत पुढील कारवाईपासून संरक्षण देण्यासाठी आरोपी मुन्नी देवीनं महिलेला पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार महिलेनं या प्रकरणाची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि तक्रारदार महिलेकडून लाच घेत असतानाच अधिकाऱ्यांनी आरोपी महिला कर्मचाऱ्याला अटक केली आहे.

लाचखोर पोलीस अधिकारी मुन्नी देवीचा प्रजासत्ताक दिनी प्रशासनाकडून गौरव करण्यात आला होता. याशिवाय तिला एक पुरस्कारही देण्यात आला होता. त्यानंतर आता त्याच महिला कर्मचाऱ्याला लाचखोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आल्यामुळं सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणातील महिलेला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई केली जात असल्याचं भिवानी पोलिसांनी सांगितलं आहे.

IPL_Entry_Point