दिल्लीतील महिला पायलटवर दोन वर्षापासून लैंगिक अत्याचार; DGCA अधिकाऱ्याला अटक, आरोपीने केले आहेत दोन विवाह
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  दिल्लीतील महिला पायलटवर दोन वर्षापासून लैंगिक अत्याचार; DGCA अधिकाऱ्याला अटक, आरोपीने केले आहेत दोन विवाह

दिल्लीतील महिला पायलटवर दोन वर्षापासून लैंगिक अत्याचार; DGCA अधिकाऱ्याला अटक, आरोपीने केले आहेत दोन विवाह

Published Oct 21, 2024 01:25 PM IST

दिल्लीत एका महिला पायलटचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपात डीजीसीएच्या एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर दोन वर्षापासून बलात्कार केली होता.

डीजीसीएच्या अधिकाऱ्याला अटक
डीजीसीएच्या अधिकाऱ्याला अटक (file photo)

राजधानी दिल्लीत डीजीसीएच्या अधिकाऱ्याने एका महिला वैमानिकावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल करून आरोपी अधिकाऱ्याला अटक केली. आरोपी आधीच विवाहित असून त्याने विवाह केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पूर्व दिल्लीतील एका महिला वैमानिकाने नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) अधिकाऱ्यावर लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षे बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. सिराज फारुकी असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी सफदरजंग एन्क्लेव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अधिकाऱ्याला अटक केली आहे.

पीडित महिला पायलटने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जून २०२२ मध्ये तिची सिराज फारुकीशी भेट झाली होती. त्यावेळी ते एका एव्हिएशन कंपनीत काम करत होते. सध्या ते डीजीसीएमध्ये सीनियर फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत. ती पायलट लायसन्ससाठी प्रशिक्षण घेत होती. यावेळी तो तरुणीच्या जवळ येऊ लागला. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर दुसरे लग्न केल्याचे आरोपीने तिला सांगितले. परंतु, आता तो दुसऱ्या पत्नीला घटस्फोट देणार असून तिच्याशी लग्न करणार असल्याचे आमिष त्याने दाखवले होते. 

जुलै २०२२ मध्ये त्याने तरुणील हैदराबादमधील एका नामांकित हॉटेलमध्ये नेले आणि तेथे तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. महिलेने त्याला पत्नीला घटस्फोट दिली की नाही, याची अनेकदा विचारणा केली, परंतु प्रत्यक्षात त्याने दुसऱ्या पत्नीला घटस्फोट देण्यासाठी अर्ज केला नव्हता. मुलीने पोलिसांना सांगितले की, आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून गेल्या दोन वर्षांपासून तिच्यावर बलात्कार केला आहे. 

जेव्हा तिने विरोध केला तेव्हा तो तिला धमकी देत असे की, जर तिने त्याच्याशी संबंध ठेवले नाहीत तर तिला एअरलाइन्स क्षेत्रात नोकरी मिळू देणार नाही. काही महिन्यांपूर्वी सिराजच्या पत्नीनेही या जोडप्याशी लग्न करण्यास होकार दिला होता, पण प्रत्यक्षात ती या गुन्ह्यात पतीला साथ देत होती, असा दावा महिलेने केला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर