rajasthan rape case : राजस्थानमध्ये मंगळवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका ३० वर्षीय महिलेवर बसच्या कंडक्टरने धावत्या बसमध्ये बलात्कार केला. ही घटना सोमवारी रात्री उशिरा जयपूरहून भरतपूरला जाणाऱ्या बसमध्ये घडली. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारी नुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र गुर्जरविरुद्ध असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी चालक आणि आरोपीला अटक केली आहे. ही घटना बयाना पोलीस ठाण्यांतर्गत घडली. भरतपूर येथील महिला ही तिच्या पतीसोबत जयपूरमध्ये राहते. पीडित महिला ही सोमवारी संध्याकाळी भरतपूरला जाण्यासाठी जयपूर येथे एका खाजगी बस (राजस्थान पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट) मध्ये बसली. जयपूरहून बस बायनाला पोहोचली. हा शेवटचा थांबा होता. मात्र, त्या रात्री महिलेला भरतपूरला जाण्यासाठी कोणतेही वाहन मिळाले नाही. महिलेने बस कंडक्टरकडे घरी पोहोचवण्यासाठी मदत मागितली. मदतीचे आश्वासन देऊन आरोपीने तिला पुन्हा बसमध्ये बसवले. यावेळी धावत्या बसमध्ये त्याने तिच्यावर बलात्कार केला .
राजस्थान स्टेट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन (RIICO) येथे उभ्या असलेल्या बसमध्ये आरोपीने बलात्कार केला. यानंतर तो पीडितेला सोडून फरार झाला. पीडित महिलेने बयाना पोलीस ठाण्यात जाऊन तिच्यावर बेतलेला प्रसंग सांगितला. पोलिसांनी याची गंभीर दखल घेत आरोपी जितेंद्र गुर्जरविरुद्ध भादंवि कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले.
बयाना पोलीस ठाण्याचे प्रभारी सुनील कुमार यांनी सांगितले की, बस कंडक्टरला अटक करण्यात आली आहे. पीडिता ही जयपूरहून आली होती आणि तिला भरतपूरला जायचे होते. ती एकटी असल्याचा फायदा घेत कंडक्टरने तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी कंडक्टरसह चालकाला अटक करून बस ताब्यात घेतली आहे.