भयंकर अनुभव, दिव्यांग महिलेने सांगितली कोलकाता एअरपोर्टवरील आपबिती; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह-woman on wheelchair alleges she was asked to stand at kolkata airport ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  भयंकर अनुभव, दिव्यांग महिलेने सांगितली कोलकाता एअरपोर्टवरील आपबिती; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

भयंकर अनुभव, दिव्यांग महिलेने सांगितली कोलकाता एअरपोर्टवरील आपबिती; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Feb 04, 2024 12:00 AM IST

Woman On Wheelchair : कोलकाता विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी एका दिव्यांग महिलेला उभे राहण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आरुषि सिंह
आरुषि सिंह

एका दिव्यांग महिलेने आरोप केला की, कोलकाता एअरपोर्टमधील सुरक्षा तपासणी दरम्यान उभे राहण्यास सांगितल्याचा दावा केला आहे. या महिलेचे नाव आरुषि सिंह आहे. तिने सोशल मीडिया साइट एक्स वर याबाबत सविस्तर लिहिले आहे. आरुषीने सांगितले की, सुरक्षा तपासणीवेळी ती व्हीलचेअरवर बसली होती. या दरम्यान महिला सीआयएसएफ जवानांनी तिला तीन वेळा उभे राहण्यास सांगितले. आरुषीने म्हटले की, हा खूपच लज्जास्पद अनुभव होता.


आरुषीच्या एक्स बायोनुसार ती एक लॉ स्टूडेंट आहे. आरुषीने याबद्दल एक फेब्रुवारी रोजी लिहिले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, काल कोलकाता एअरपोर्टवर सुरक्षा तपासणी दरम्यान महिला अधिकाऱ्याने मला उभे राहून दोन पावले चालण्यास सांगितले. मी व्हीलचेअरवर होते तसेच तिने सांगितले की, ती एक दिव्यांग आहे. आत जाताना पुन्हा महिला अधिकाऱ्याने मोठ्या आवाजात म्हटले की, केवळ दोन मिनिटे उभे राहून दाखवा. यावर मी त्यांनी पुन्हा सांगितले की, मी जन्मापासून दिव्यांग आहे. आरुषीनुसार अशा प्रकारचा व्यवहार खूप भयंकर व लज्जास्पद आहे.

व्हीलचेअर मिळण्यातही विलंब - 
आरुषीने म्हटले की, यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. मात्र वाटते की, कोलकाता एअरपोर्टने मागील घटनांपासून काहीच धडा घेतलेला नाही. आरुषीने  पुढे लिहिले आहे की, एअरपोर्ट सुरक्षेत तैनात सीआयएसएफ मॅनुअल दिव्यांग लोकांचा अपमान करण्याची सूट देतो. त्यांनी म्हटले की, तमाम व्हीलचेयर सहायक प्रवाशांची मदत करत होते. मात्र प्रश्न विचारणाऱ्या महिला अधिकाऱ्याने याची गरज वाटली नाही. केवळ इतकेच नाही तर व्हीलचेयर मिळण्यातही २० मिनिटे विलंब लागला. याप्रकरणी अजूनपर्यंत सीआयएसएफ आणि कोलकाता एअरपोर्टकडून कोणतेही निवेदन देण्यात आलेले नाही.

Whats_app_banner
विभाग