मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पतीला म्हटलं गुडबाय अन् नंतर महिलेने ३ वर्षीय चिमुकल्याच्या डोक्यात मारली गोळी, काय होतं कारण?

पतीला म्हटलं गुडबाय अन् नंतर महिलेने ३ वर्षीय चिमुकल्याच्या डोक्यात मारली गोळी, काय होतं कारण?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 07, 2024 05:21 PM IST

Woman killed her Son : महिलेने घटस्फोट झालेल्या पतीला व्हिडिओ कॉल करून तीन वर्षीय मुलाला गुडबाय म्हणायला लावले व त्यानंतर डोक्यात गोळी घालून त्याची हत्या केली.

महिलेने ३ वर्षीय चिमुकल्याच्या डोक्यात मारली गाळी, अन् स्वत:ही केली आत्महत्या
महिलेने ३ वर्षीय चिमुकल्याच्या डोक्यात मारली गाळी, अन् स्वत:ही केली आत्महत्या

अमेरिकेतील टेक्सासमध्ये महिला आणि तिच्या तीन वर्षीय मुलाच्या मृत्यूचा खुलासा झाला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ३२ वर्षीय महिलेने आधी आपल्या तीन वर्षीय मुलाची गोळी मारून हत्या केली व त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली. महिला आणि तिच्या मुलाच्या हत्येचा गुंता महिलेच्या २१ सेकंदाच्या व्हिडिओने सोडवला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिला गेल्या काही दिवसांपासून मानसिक तनावात होती. तिचा तिच्या माजी पतीसोबत वाद सुरू होता. मृत्यूपूर्वी तिने आपल्या मुलाला त्याच्या वडिलांना गुडबाय म्हणायला लावले. त्यानंतर त्याला मेसेज करून म्हटले की, आपल्या मुलाला गुडबाय बोल.

ट्रेंडिंग न्यूज

मीडिया रिपोर्टनुसार महिलेचे नाव सवाना क्रिगर होते. तिने आधी आपल्या तीन वर्षाच्या चिमुकल्याची गोळी मारून हत्या केली व त्यानंतर त्याच बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडत आपले जीवन संपवले. ही घटना १९ मार्च रोजी सॅन एंटोनियो येथील एका पार्कमध्ये घडली होती. क्रिगर आणि तिचा मुलगा कैडेन मृतावस्थेत आढळले होते. त्यांच्या डोक्यात गोळीचे निशाण होते.

पोलीस अधिकारी अनेक दिवसांपासून ही हत्या की आत्महत्या याचा तपास करत होते. दरम्यान महिलेने आपल्या माजी पतीला पाठवलेल्या शेवटच्या मेसेजने या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यूपूर्वी क्रिगरचे वर्तन विचित्र होते. तिने तिच्या माजी पतीला धमकी देणारे व्हिडिओ व टेक्स्ट मेसेज पाठवले होते. 

पतीच्या घरात जाऊन केली तोडफोड - 

क्रिगरने १८ मार्च रोजी दुपारी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ती थेट माजी पतीच्या घरी गेली होती. मात्र त्याची भेट झाली नाही, तो कामावर गेला होता. आपल्या माजी पतीच्या घरात तोडफोड केल्यानंतर क्रिगर आपल्या घरी परतली होती. पोलिसांना तपासादरम्यान क्रिगरचा लग्नातील पोशाख आणि बेडवर काही फोटो मिळाले. 

क्रिगरने मृत्यूपूर्वी म्हटले होते की, आता माझ्याकडे घरात राहण्यासाठी काहीच नाही. त्यानंतर माजी पतीला पाठवलेल्या शेवटच्या मेसेजमध्ये म्हटले होते की, आपल्या मुलाला गुडबाय म्हण. २१ सेकंदाच्या या व्हिडिओत क्रिगर आणि तिचा मुलगा एका पार्कमध्ये बसल्याचे दिसून येत आहेत. तेथेच त्यांचे मृतदेह आढळून आले.

IPL_Entry_Point

विभाग