मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  महिला IRS अधिकाऱ्याने केले लिंग परिवर्तन, मिळाले नवीन नाव; सरकारनेही दिली मंजुरी

महिला IRS अधिकाऱ्याने केले लिंग परिवर्तन, मिळाले नवीन नाव; सरकारनेही दिली मंजुरी

Jul 10, 2024 04:28 PM IST

Gender Changed : एका वरिष्ठ आयआरएस महिला अधिकाऱ्याने आपले लिंग परिवर्तन केले आहे. अर्थ मंत्रालयाने ऐतिहासिक निर्णय घेत सर्व अधिकृत कागदपत्रांमध्ये त्यांचे नाव व लिंग बदलण्याची मागणी स्वीकार केली आहे.

महिला IRS अधिकाऱ्याने केले लिंग परिवर्तन
महिला IRS अधिकाऱ्याने केले लिंग परिवर्तन

भारतीय महसूल सेवा (आयआरएस) मधील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने आपले लिंग परिवर्तन केले आहे. अर्थ मंत्रालयाने ऐतिहासिक निर्णय घेत सर्व अधिकृत कागदपत्रांमध्ये त्यांचे नाव व लिंग बदलण्याची मागणी स्वीकार केली आहे. भारतीय सिविल सेवामध्ये अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. 

हैदराबादमध्ये सीमा शुल्क, उत्पादन शुल्क आणि सेवा कर न्यायाधिकरण (सीईएसटीएटी) चे मुख्य आयुक्त कार्यालयात संयुक्त आयुक्त पदावर नियुक्त एम अनुसूया यांनी लिंग आणि नाव परिवर्तन करण्याची विनंती केली होती. त्यांनी आपले नाव बदलून एम अनुकथिर सूर्या असे ठेवले आहे. त्याचबरोबर त्यांनी लिंग या कॉलमध्ये महिलेच्या जागी पुरुष लिहिण्याची विनंती प्रशासनाकडे केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सूर्याने डिसेंबर २०१३ मध्ये चेन्नईमध्ये सहायक आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांना डेप्युटी कमिश्नर बनवले गेले. त्यांना मागच्या वर्षी हैदराबादमध्ये वर्तमान पोस्टिंग मिळाली होती. त्यांनी चेन्नईमधील मद्रास इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून इलेक्ट्रॉनिक्स विषयात पदवी घेतली होती. त्यानंतर २०२३ मध्ये भोपाळमध्ये नॅशनल लॉ इंस्टीट्यूट यूनिवर्सिटीमधून सायबर लॉ आणि सायबर फोरेंसिक विषयात पीजी डिप्लोमा पूर्ण केला होता.

१५ एप्रिल २०१४ रोजी नालसा प्रकरणात सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय दिला होता. न्यायालयाने तिसऱ्या लिंगाला मान्यता दिली होती. त्याचबरोबर म्हटले होते की, लिंग निवड करणे एक वैयक्तिक पर्याय आहे. या निर्णयानंतर ओडिशा राज्यातील एका पुरुष अधिकाऱ्याने ओडिशा महसूल सेवेत सामील झाल्यानंतर पाच वर्षांनी २०१५ मध्ये आपले लिंग बदलून महिला बनण्याचा निर्णय घेतला होता.

लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलेला ट्रान्सजेंडर पुरुष निघाला गरोदर -

एक ट्रान्सजेंडर व्यक्ति गरोदर राहिल्याची एक विचित्र घटना पुढे आली आहे. हा व्यक्ति लिंग बदलशस्त्रक्रिया करण्यासाठी दवाखान्यात गेला होता. यावेळी त्यांची तपासणी करत असतांना तो गेल्या पाच महिन्यांपासून गरोदर असल्याचे समोर आले. डॉक्टरांनी त्यांना लिंग बदल करण्याची शस्त्रक्रिया थांबवण्याचा सल्ला दिला आहे. ही घटना युरोपियन देश इटली येथे घडली आहे. इटलीतील अशा प्रकारची ही पहिलीच घटना असल्याचे मानले जात आहे.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर