शेजाऱ्याच्या ३ वर्षाच्या मुलाची हत्या करून मृतदेह वॉशिंग मशीनमध्ये लपवला, कारण धक्कादायक!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  शेजाऱ्याच्या ३ वर्षाच्या मुलाची हत्या करून मृतदेह वॉशिंग मशीनमध्ये लपवला, कारण धक्कादायक!

शेजाऱ्याच्या ३ वर्षाच्या मुलाची हत्या करून मृतदेह वॉशिंग मशीनमध्ये लपवला, कारण धक्कादायक!

Published Sep 12, 2024 08:25 PM IST

3 year old boys body found in washing machine In Tamil Nadu: तामिळनाडूच्या तिरुनेलवेली येथील एका महिलेने शेजाऱ्याच्या मुलाची हत्या करून मृतदेह वाशिंग मशीनमध्ये लपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

शेजारच्या ३ वर्षाच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी एका महिलेला अटक
शेजारच्या ३ वर्षाच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी एका महिलेला अटक (HT_PRINT)

Woman Held for Strangling Three-Year-Old Boy: तामिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यातील राधापुरम पोलिसांच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली. शेजाराच्या ३ मुलाची हत्या करून त्याचे मृतदेह वॉशिंग मशीमध्ये लपवल्याप्रकरणी एका महिलेला अटक झाली. आरोपी महिलेचे मृत मुलाच्या कुटुंबाशी तणावपूर्ण संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण तामिळनाडूमधील आठकुरीची गावातील आहे. संजय असे मृत मुलाचे नाव आहे. तर, थंगम्माल असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. संजय हा सोमवारी सकाळी घराबाहेर खेळायला गेला. परंतु, अंगणवाडीत जाण्याची वेळ झाल्यामुळे संजयच्या आईने त्याला हाक मारली. परंतु, बाहेरून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संजयच्या आईने आजूबाजुच्या परिसरात त्याचा शोध घेतला. संपूर्ण गाव शोधल्यानंतर संजय बेपत्ता असल्याचे त्याच्या पालकांना समजले.

संजयचे वडील विघ्नेश यांनी आपला मुलगा बेपत्ता असल्याची स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यात आपल्या शेजारी राहणाऱ्या थंगम्मलचा हात असावा, असा विघ्नेशला संशय होता. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी थंगम्मलच्या घराची झडती घेतली केली. त्यावेळी पोलिसांना वॉशिंग मशीनमध्ये संजयचा मृतदेह गोणीत गुंडाळलेला आढळून आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी कन्याकुमारी येथील असारीपल्लम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवण्यात आला.

हत्येचे कारण

जिल्हा एसपी एन सिलंबरासन आणि डीएसपी आर योगेश कुमार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. थंगम्मल याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. यात आणखी काही जण सहभागी आहेत का, याचाही तपास पोलीस करत आहेत. रस्ता अपघातात आपल्या मुलाच्या मृत्यूसाठी थंगम्मलने विघ्नेशच्या कुटुंबाला जबाबदार धरले होते, ज्यामुळे त्याचे वैर आणखी वाढले होते. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

बिहार: वहिनीसोबत अनैतिक संबंध, धाकट्या भावाने थोरल्याला संपवले

वहिनीसोबतचे अनैतिक संबंध आणि भावाच्या कर्जबाजारीपणाच्या सवयीला कंटाळून धाकट्या भावाने मोठ्या भावाची हत्या केली. पोलिसांनी मारेकऱ्याचा धाकटा भाऊ पप्पू कुमार आणि त्याचा साथीदार मदन कुमार यांना अटक केली आहे.तर, धर्मेंद्र सिंह असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ ऑगस्ट रोजी पुनकाला गावातील धर्मेंद्र सिंह यांची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर धर्मेंद्र यांचा मृतदेह लोधर गावातील एका शेतात फेकला. याप्रकरणी पोलिसांनी २९ ऑगस्ट रोजी परैया पोलीस ठाण्यात अज्ञात गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष पथक तयार केले.तपासादरम्यान पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांचीही चौकशी केली असता मृताच्या धाकट्या भावाने थोरल्या भावाची हत्या केल्याची कबूली दिली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर