ही घटना खूपच धक्कादायक असून महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढवणारी आहे. ही घटना बेंगळुरुमधील आहे. येथे एका रिक्षाचालकाने दोन तरुणींशी गैरव्यवहार कर एकीच्या कानशिलात लगावली. सांगितले जात आहे की, मुलींनी राईड कॅन्सल केल्याने ऑटो चालक भडकला आणि मुलींना थप्पड लगावली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून लोक संतप्त झाले आहेत.
ऑटो राईड रद्द केल्यामुळे नाराज झालेल्या ऑटो चालकांने महिलांशी वाद घालत एकीला थप्पड लगावली. यावेळी महिला दुसऱ्या रिक्षामध्ये बसल्या होत्या. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी बेंगळुरु पोलिसांकडे केली जात आहे. दरम्यान यूजर्सकडून' ओला' सारख्या कंपन्यानाही सवाल केला जात आहे की, ते आपल्या चालकांची पार्श्वभूमीची चौकशी करतात की नाही?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, ऑटो चालकाने राइड कॅन्सल केल्यामुळे तरुणींशी वाद घालायला सुरूवात केली. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ऑटो चालकाविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
व्हिडिओमध्ये दिसते की, रिक्षाचालक मोठ्या आवाजात दुसऱ्या रिक्षात बसलेल्या तरुणींशी बोलत आहे. यावेळी मुली म्हणतात की, तुम्ही इतके ओरडत का आहात? यानंतर रिक्षाचालक रागाने म्हणतो की, गॅस काय तुझा बाप देतो का.एक तरुणी म्हणते की, असा वाद घातला तर पोलीस ठाण्यात तक्रार करेन.
विशेष म्हणजे पोलिस तक्रार करण्याची गोष्टही हलक्यात घेत रिक्षाचालक म्हणतो की, हा तर चल पोलिसांकडे. व्हिडिओमध्ये मुलगी म्हणताना ऐकू येते की, राईड कॅन्सल करून तिने असा काय गुन्हा केला आहे. तुम्हीही आमची राईड कॅन्सल करत असता. यानंतर रिक्षाचालक मुलीला थोबाडीत मारतो. त्यानंतर मुलगी जोरजोरात ओरडते की, तुम्ही मला मारले का, कशामुळे मारले. मुलीचा आवाज ऐकून लोक जमा होतात. त्यानंतर रिक्षाचालक तेथून निघून जातो.
ही क्लिप @karnatakaportf हँडरवरून पोस्ट करण्यात आली असून आतापर्यंत ३५ हजारहून अधिक व्ह्युज आणि शेकडो लाईक्स मिळाल्या आहेत. त्याचबरोबर यूजर्स बेंगळुरु पोलिसांकडे ऑटो चालकाविरोधात कडक कारवाईची मागणी करत आहेत.