पतीला इंस्टाग्राम, फेसबुक चालवायला येत नव्हते, मॉडर्न पत्नीने ‘रीलबाज’ दीराशी अवैध संबंध ठेऊन पतीला संपवलं-woman had relations with brother in law lover killed her husband because husband did not use instagram facebook ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पतीला इंस्टाग्राम, फेसबुक चालवायला येत नव्हते, मॉडर्न पत्नीने ‘रीलबाज’ दीराशी अवैध संबंध ठेऊन पतीला संपवलं

पतीला इंस्टाग्राम, फेसबुक चालवायला येत नव्हते, मॉडर्न पत्नीने ‘रीलबाज’ दीराशी अवैध संबंध ठेऊन पतीला संपवलं

Sep 10, 2024 07:56 PM IST

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली. या हत्येमागचे तात्कालिक कारण प्रियकर आणि पती यांच्यातील भांडण होते, पण त्यामागे मृताच्या पत्नीचा हात असल्याचे समोर आले आहे.

दीराच्या प्रेमात पत्नीने पतीची केली हत्या
दीराच्या प्रेमात पत्नीने पतीची केली हत्या

ग्वाल्हेरमध्ये हत्या आणि प्रेमाचा अनोखा प्रकार समोर आला आहे. महिलेला फॉरवर्ड नवरा हवा होता. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारा, इन्स्टाग्राम आणि फेसबुक कसं चालवायचं हे जाणणारा नवरा हवा होता. पण नवऱ्याला मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अजिबात रस नव्हता. दरम्यान, महिलेचे पतीच्या मावस भावासोबत अनैतिक संबंध वाढू लागले. तोही निरक्षर होता, पण सोशल मीडियाचे चांगले ज्ञान होते.  यानंतर महिलेचे सोशल मीडियावर हिरोशी म्हणजे दीराशी जवळीक वाढली, तर सोशल मीडियावरील झिरोपासून म्हणजेच नवऱ्यापासून अंतर वाढू लागलं. वाढत्या अंतरामुळे पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला मार्गातून हटवण्याचा निर्णय घेतला व त्याची हत्या केली. 

ग्वाल्हेरचे एसडीओ संतोष पटेल यांनी सांगितले की, भिंड आलमपूर येथील रहिवासी महावीर शरण कौरव यांची पत्नी ज्योती कौरव आणि महावीर यांच्या मामाचा मुलगा सुरेंद्र कौरव यांनी हत्या केली. माझ्या नवऱ्याला तुरुंगात कैद असलेल्या नातवाईकाला भेटण्याच्या बहाण्याने ग्वाल्हेरला घेऊन जायचे आणि मग वाटेत त्याचे काम तमाम करायचे, असा ज्योतीने प्लान बनवला.  ग्वाल्हेर कारागृहात असलेल्या खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला भेटण्याच्या बहाण्याने महावीरला त्याच्या मामाचा मुलगा आरोपी सुरेंद्र कौरव घेऊन गेला. 

तुरुंगात नातेवाईकाला भेटल्यानंतर दोघेही ग्वाल्हेरहून आलमपूरला रवाना झाले. दरम्यान, वाटेत सुरेंद्र याला महावीर यांच्या पत्नीचा अनेकदा फोन आला. निर्जन परिसर पाहून दोघांनी थांबून एकत्र गांजा ओढला.  दरम्यान, महावीर यांनी विचारले की, तुला माझी पत्नी ज्योतीचाफोन वारंवार का येत आहे? यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे सुरेंद्रने महावीरच्या डोक्यावर दगड घालून त्याचा खून केला. मद्यधुंद अवस्थेत महावीरचा मृत्यू झाला.

हत्येनंतर महावीरच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. सुरेंद्रने मृतदेह विहिरीत फेकून दिला आणि त्याचा फोन आणि पाकीट आपल्याजवळ ठेवले. प्रेयसीला फोनवरून काम फत्ते झाल्याची माहिती दिली. यावर ज्योतीने त्याला पुरावे लपविण्यास सांगितले. फोन आणि कपडे कुठेतरी लपवा. दुचाकी कालव्यात टाका. म्हणत तिने सुरेंद्रला पैसे ट्रान्सफर केले आणि नवीन कपडे विकत घेऊन अयोध्येला जाण्यास सांगितले. जेणेकरून त्याच्यावर कोणीही संशय घेणार नाही.

हत्येनंतर पाच तासांनी ज्योती सासऱ्याला घेऊन  पोलिस ठाण्यात पोहोचली आणि पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पण नंतर पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तिची चौकशी केली. आरोपी सुरेंद्रने सांगितले की, काही वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीचा कर्करोगाने मृत्यू झाला होता. त्यानंतर ज्योतीशी त्याची जवळीक वाढू लागली. जवळपास दीड वर्षांपासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. पण महावीरला आमच्या नात्याबद्दल शंका येऊ लागली. घटनेच्या दिवशीही मला ज्योतीचा फोन आल्याने महावीरने वाद घातला होता. त्यातूनच त्याची दगडाने टेचून हत्या करण्यात आली.

डीएसपी संतोष पटेल यांनी सांगितले की, घटनेनंतर मृताच्या पत्नीशी बोलल्याचे पुरावे मिळाल्यानंतर ज्योतीचा मोबाइल तपासण्यात आला. पण तिने फोन फॉरमॅट केला होता. संशयावरून तिची चौकशी केली असता महिलेने हा सगळा प्रकार उघड केला. 

Whats_app_banner