मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  हा काय प्रकार? मीटिंग रूममधील उरलेलं सँडविच खाल्लं म्हणून महिलेला नोकरीवरून काढलं!

हा काय प्रकार? मीटिंग रूममधील उरलेलं सँडविच खाल्लं म्हणून महिलेला नोकरीवरून काढलं!

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 22, 2024 12:53 PM IST

Woman Fired For Eating Leftover Sandwich : ब्रिटनमध्ये एका कंपनीच्या मीटिंगरूममध्ये प्लेटमध्ये अर्थवट असलेले सँडविच खाल्ल्याने महिलेला कामावरून काढून टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

गॅब्रिएला रॉड्रिग्ज
गॅब्रिएला रॉड्रिग्ज

Woman Fired For Eating Leftover Sandwich : ब्रिटनमधील कायदेक्षेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या डेव्हनशायर सॉलिसिटर या लॉफर्ममध्ये धक्कादायक घटना घडली आहे. कंपनीत स्वच्छतेचे काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने मीटिंग रूममध्ये असलेल्या प्लेटमध्ये शिल्लक राहिलेले ट्यूना सँडविच खाल्ल्याने तिला कंपनीतून काढून टाकण्यात आले. गॅब्रिएला रॉड्रिग्ज असे या महिलेचे नाव असून या महिलेने तिच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

Satyapal Mailk : मोदी सरकारविरोधात बोलणारे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर सीबीआयचे छापे

स्थलांतरित कामगारांच्या हक्कांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युनायटेड व्हॉइसेस ऑफ वर्ल्ड युनियनने दिलेल्या माहितीनुसार, टोटल क्लीन या कंत्राटदार कंपनीला या संदर्भात मिळेल्या तक्रारीनुसार या महिलेला गेल्या वर्षी ख्रिसमसच्या काही दिवस आधी कामावरून काढून टाकण्यात आले होते. सुश्री रॉड्रिग्जने या महिलेले १.५० युरो (अंदाजे १३४ रुपये) किमतीचे उरलेले सँडविच खाल्ले, जे वकिलांच्या बैठकीनंतर कचऱ्यात फेकून दिले जाणार होते. कायदेशीर घडामोडीची माहिती देणारि वेबसाइट रोल ऑन फ्रायडे या कंपनीनुसार या महिलेला कंपनीची क्लायंटची मालमत्ता, अधिकार आणि नुकसान केल्याबद्दल काढून टाकण्यात आले. युनियनने दावा केला आहे की, सुश्री रॉड्रिग्जला काढून टाकण्याची ही कृती भेदभावाची आहे. ती जर लॅटिन अमेरिकन अससाती तर कंपनीने तिला या क्षुल्लक कारणावरून काढून टाकले नसते.

या महिलेवर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामगार एकत्र आले असून तिला पुन्हा कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी त्यांनी १४ फेब्रुवारी रोजी कंपणीपुढे आंदोलन केले. अनेक कामगारांनी हातात "ट्यूनाचे १०० कॅन आणि सँडविच, तसेच कंपनीचा निषेध करणारे फुगे हातात घेऊन मोठे आंदोलन केले.

‘एक्स’वरील काही अकाउंट्सवर बंदी घालण्याचे भारत सरकारचे आदेश; एलॉन मस्क यांच्या कंपनीचा खळबळजनक दावा

आउटलेटला दिलेल्या मुलाखतीत, सुश्री रॉड्रिग्ज या बाबत म्हणाल्या, कर्मचारी सदस्यांनी दुपारच्या जेवणानंतर उरलेले पदार्थ खने ही सामान्य प्रथा आहे. त्या दिवशी देखील कंपनीत मीटिंग झाल्यावर वकिलांनी बैठकीनंतर कॅन्टीनमध्ये काही सँडविच न खाता टाकून दिले होते. दरम्यान, ही शिल्लक ठेवलेले सँडविच मी खाल्ले. या घटनेनंतर एका आठवड्यानंतर मला माझी शिफ्ट संपण्याच्या १५ मिनिटे आधी बोलावून कामावरून काढून टाकण्यात आल्याचे सांगितले. ही बाब अन्यायकारक आहे.

युनायटेड व्हॉइसेस ऑफ वर्ल्डचे सरचिटणीस पेट्रोस एलिया म्हणाले, "स्वच्छता कर्मचाऱ्यांना कोणत्याही क्षुल्लक कारणांवरून काढून टाकले जाते. देशभरात दररोज अशा भेदभावाच्या घटना घडत असतात. गॅब्रिएला देखील त्यापैकी एक आहे. तिच्यावर अन्याय झाल्याबद्दल आणि तिला न्याय देण्यासाठी लढा देऊ.

टोटल क्लीनच्या प्रवक्त्याने आउटलेटला दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्याने दिलेली माहिती चुकीची आहे. आम्ही जे काही केले ते रोजगार कायद्यानुसार योग्य तपास आणि शिस्तभंगाच्या प्रक्रियेनंतर माहिती घेऊन केले आहे.

पुढे, लंडन लॉ फर्मने सांगितले की त्यांनी सुश्री रॉड्रिग्ज विरुद्ध "औपचारिक तक्रार" केली नाही. तसेच टोटल क्लीनला कोणतीही कारवाई करण्यास सांगितले नाही. "टोटल क्लीनने स्वतःचा तपास केला आणि डेव्हनशायरच्या कोणत्याही इनपुट किंवा प्रभावाशिवाय गॅब्रिएला काढून टाकण्याचा निर्णय घेतला .

IPL_Entry_Point

विभाग