Uttar Pradesh Viral Video: रील्स बनवण्याच्या आणि सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी कोण कुठल्या थरापर्यंत जाईल, हे सांगता येत नाही. सोशल मीडियावर कमी वेळात प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुण- तरुणी इमारतीच्या कडेला लटकण्यापासून ते बाईक स्टंट करण्यापर्यंत असे अनेक धोकादायक मार्ग अवलंबताना दिसत आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक महिला महामार्गाच्या मधोमध नाचताना दिसत आहे. असे करणे तिच्या जीवावर देखील बेतू शकते, याची तिला चांगली जाणीव असतानाही ती रस्त्यावर नाचत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
हा व्हिडिओ निशांत शर्मा या युजरने एक्सवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, "व्हिडिओ पाहा, ती रस्त्याच्या मधोमध कशी डान्स करत आहे आणि मागून वाहने भरधाव वेगाने येत आहेत. गाडीच्या छतावरून उडी मारून तिने रस्त्याची पांढरी रेषाही ओलांडली!
ही पोस्ट १९ ऑगस्ट रोजी शेअर करण्यात आली होती. पोस्ट केल्यापासून त्याला दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या शेअरला ५०० हून अधिक लाईक्स मिळाले असून या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या असंख्य कमेंट्स येत आहेत. यूपी पोलिसांच्या अधिकृत एक्स हँडलनेही यावर प्रतिक्रिया दिली आणि लिहिले की, ‘कृपया आवश्यक कारवाईसाठी वाहन क्रमांक, वेळ, तारीख आणि ठिकाणाची माहिती द्या.’
या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया देताना एका युजरने म्हटले आहे की, तरुणीने भररस्त्यात अतिशय लाजीरवाणे कृत्य केले आहे. दुसऱ्या युजरने सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यावर रील बनवण्यावर बंदी घालण्यात यादी. तिसऱ्या युजरने म्हटले आहे, रील बनवणाऱ्यांनी रस्ता, मंदीर, बाग, रेल्वे, बस अशी कोणतीच जागा शिल्लक ठेवली नाही. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस या महिलेविरोधात नेमकी कोणती कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.