Viral News: या आठवड्यात मेट्रोमध्ये 'स्त्री २'च्या 'आज की रात' या गाण्याच्या तालावर थिरकणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या क्लिपमुळे अनेकजण विभाजित झाले. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी महिलेच्या धाडसाचे कौतुक केले, तर काहींनी तिच्या कामगिरीवर टीका केली आहे.
हा व्हिडिओ एका '_sahelirudra' व्यक्तीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओला 'ऑन पब्लिक डिमांड' असे कॅप्शन देण्यात आले आहे. मेट्रोच्या डब्याच्या मधोमध 'आज की रात' या गण्यावर तरुणी डान्स करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये प्रवासी तिचा परफॉर्मन्स पाहताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओला इन्स्टाग्रामवर दहा लाखांहून अधिक व्ह्यूज आणि २८ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहे. एका युजरने म्हटले आहे की, ‘कोणत्या लोकांनी तुला असे लाजिरवाणे कृत्य करण्यास सांगितले.’ दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, ‘प्रत्येक व्यक्ती मनोरंजनासाठी मेट्रोत येत नाही. यामुळे असे व्हिडिओ बनवताना काळजी घे.’ तिसऱ्या युजरने म्हटले आहे की, ‘इंडियाज गॉट टॅलेंट! पण हे चुकीच्या ठिकाणी दाखवण्यात आले.’ आणखी एका युजरने म्हटले आहे की, ‘मेट्रोमध्ये डान्स करुन भीक मागण्याची परवानगी नाही.’