Lat Lag Gayee Dance Video: सासू-सून यांच्यातील नातेसंबंधांवर अनेक टीव्ही शोज आहेत, ज्यामध्ये त्यांच्यातील तू-तू-मैं-मैं बघायला मिळते. अनेक सासू आणि सूनेच्या नादात मज्जा कमी आणि वाद जास्त असतात. हे अनेक घरांमध्ये पाहायला मिळते. अनेक सून सांगतात की सासू आपल्याला आपल्या मुलीसारखी का वागवत नाही. तर सून आपल्याशी आईसारखी वागणूक का देत नाही, अशी सासूची तक्रार असते. मात्र, काही घरांमध्ये सासू-सुनेचे नाते खूपच मस्त असते, याचे ताजे उदाहरण म्हणजे सोशल मीडियावर व्हयरल झालेला एक व्हिडीओ.
या व्हायरल इंस्टाग्राम रीलमध्ये सासू स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना दिसत आहे. तर सून साडीत तिच्या सासूपासून काही अंतरावर जॅकलिनच्या 'लत लग गई...' गाण्यावर मस्त नाचताना दिसत आहे. मात्र, सुरुवातीला सासू सुनेकडे पाहत नाही. पण सुनेला अप्रतिम डान्स मूव्ह्ज करताना पाहताच तिच्या चेहऱ्यावर हसू येते. एवढेच नाही तर सून सासूच्या जवळ जाऊन नाचू लागते. सासू-सुनेचे हे बॉन्डिंग पाहून सोशल मीडियावरील पब्लिक त्यांचे फॅन झाले आहे.
बघा हा व्हायरल व्हिडीओ
नेटीझन्सच्या प्रतिक्रया
हा व्हिडीओ इन्स्टाग्राम युजर सावित्री दिडवानियाने शेअर केला आहे.व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले – सासूच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा करा... मी जसे आहे तसे राहणे निवडले आणि तिने मला जसा आहे तसा स्वीकारले. असे मस्त आई-वडील आणि कुटुंब मिळाल्याबद्दल धन्य आहे. ही बातमी लिहेपर्यंत ८६ हजारांहून अधिक लाईक्स आणि १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच शेकडो युजर्स यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत.
संबंधित बातम्या