Trending News: रील बनवण्यासाठी तरुणीनं काय केलं बघा; येणारे- जाणारे पाहतंच बसले!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Trending News: रील बनवण्यासाठी तरुणीनं काय केलं बघा; येणारे- जाणारे पाहतंच बसले!

Trending News: रील बनवण्यासाठी तरुणीनं काय केलं बघा; येणारे- जाणारे पाहतंच बसले!

Published Jul 16, 2024 04:52 PM IST

Viral Video: तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Mumbai: रील बनवण्यासाठी कोण कुठल्या थराला जाईल, याचा काही नेम नाही. काही लोक त्यांच्या टॅलेंटच्या जोरावर लोकप्रियता मिळवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी चुकीची कामे करतात. नुकताच दोन मुलींचा मुंबईतील रेल्वे स्थानक आणि ट्रेनमध्ये नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर रेल्वे पोलिसांनी त्यांच्याविरोधात कारवाई केली. यातच एका तरुणीचा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रतिष्ठित इमारतीजवळ डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ बृहन्मुंबई पालिका इमारतीजवळचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, संबंधित तरुणी अशा ठिकाणी डान्स करत, जिथून लोक सतत ये-जा करत आहेत. या तरुणीचा बेली डान्स पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. काही जणांनी संताप व्यक्त केला. तर, काही लोकांनी तरुणीच्या डान्सचे कौतूक केले. मात्र, हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तरुणीविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. सार्वजनिक ठिकाणी असे डान्स करणे चांगले दिसत नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे.

aliyamirja_dancer नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला, या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक केले आहे. संबंधित इन्स्टाग्राम अकाऊंट तपासले असता असे आढळून आले की, बहुतांश व्हिडिओ सार्वजनिक ठिकाणी रेकॉर्ड करण्यात आले आहेत. परंतु, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रतिष्ठित इमारतीजवळ काढण्यात आलेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

एकाने युजरने म्हटले आहे की, या मुलीला नाचायला लाज वाटत नाही, तिला कुठेही नाचायला सांगा. एक युजर म्हणाला की, नाचणे ठीक आहे पण लोकांना त्रास का होतोय? प्रवाशांना त्रास होत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. आणखी एका युजरने लिहिले आहे की, तुम्ही तुमच्या घरी असे डान्स करा, जर तुम्ही माझ्यासमोर असे करताना दिसले तर मारेल.एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले की, जर मी माझ्या वाटेत एखाद्याला असा डान्स करताना दिसला, तर मला ते सहन होणार नाही आणि तिथेच त्याच्या कानशिलात देईन. एकजण म्हणतोय, आजकाल लोक रीलसाठी काहीही करायला तयार आहेत, आज आपला समाज कुठे चालला आहे?

याआधीही असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर लवकरात लवकर प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे व्हिडिओ तयार केले जातात. याप्रकरणी पोलिसांनी अनेकांवर कारवाई केल्याची आपण पाहिले आहे. मात्र, तरीही काही जण असे व्हिडिओ तयार करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर