मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Suicide Case : पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीची आत्महत्या; भिंतीवर लाल शाईत लिहिल्या छळाच्या कहाण्या!

Suicide Case : पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीची आत्महत्या; भिंतीवर लाल शाईत लिहिल्या छळाच्या कहाण्या!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 11, 2022 09:38 AM IST

Suicide Case : महिलेनं आत्महत्या करण्यापूर्वी तिला त्रास देणाऱ्या लोकांची नावं लाल शाईत भिंतीवर लिहून ठेवली, त्यामुळं तपासासाठी पोहचलेल्या पोलिसांनाही ते पाहून धक्का बसला.

Suicide Case In Jharkhand
Suicide Case In Jharkhand (HT_PRINT)

Suicide Case In Jharkhand : देशात हुंडा रोखण्यासाठी आतापर्यंत अनेक कायदे आणि योजना सरकारमार्फत आणल्या गेलेल्या आहेत. याशिवाय हुंडा घेण्याची मानसिकतेला आळा घालण्यासाठी अनेक सामाजिक संघटना या काम करत असतात, परंतु ही समस्या अजूनही संपलेली नाही. कारण आता लग्नानंतर हुंड्यासाठी छळणाऱ्या पतीला कंटाळून एका विवाहित महिलेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. झारखंडच्या खलारी भागात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव चंदा देवी असून मृत्यूपूर्वी तिनं भिंतीवर सुसाईड नोट लिहिली होती. त्यात तिनं ज्या लोकांनी तिला त्रास दिली आहे, सर्वांची नावं लिहिली आहे, याशिवाय तिनं मृत्यूसाठी सुसाईड नोटमध्ये पतीला जबाबदार धरलं आहे. विवाह झाल्यापासून तो तिच्या घरून हुंडा घेऊन येण्यासाठी दबाव टाकत होता, सातत्यानं तिला मारहाण करत होता, त्यामुळं पत्नी चंदा देवी ही नैराश्येच्या गर्तेत होती.

काय आहे नेमकं प्रकरण?

झारखंडमधील खलारीत राहणाऱ्या दिलीप कुमार यांच्याशी चंदा देवीचा २०१९ मध्ये विवाह झाला होता. तेव्हापासून दिलीपनं त्याची पत्नी चंदाकडे हुंड्यासाठी तगादा लावला होता. लग्नाचा हुंडा न मिळाल्यामुळं आणि त्यातच चंदा देवीला दोन मुली झाल्यानं सासरच्या लोकांमध्ये प्रचंड नाराजी होती. त्यामुळं तिची सतत छळवणूक केली जात होती, माहेरून १५ लाख रुपये आणले नाही म्हणून चंदा देवीला मारहाण केली जात होती, तिला खायलाही दिलं जात नव्हतं. त्यामुळं या सगळ्या प्रकाराला कंटाळून चंदा देवीनं बंद खोलीत आयुष्य संपवलं आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चंदादेवीच्या सुसाईड नोटवरून आणि त्याच्या भावाच्या स्टेटमेंटवरून तिचा पती आणि सासरच्या लोकांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनीही या घटनेच्या तपासात चंदादेवीचा छळ झाल्याचं मान्य केलं असून पुढील तपास केला जात आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग