किक चित्रपटातील 'मौत को छूकर टक से वापस' हा प्रसिद्ध डायलॉग तुम्हाला माहीत असेलच, पण खऱ्या आयुष्यात चार वेळा मृत्यूवर मात केल्याचा दावा जर कोणी करत असेल तर तुम्ही काय म्हणाल? जगात अनेक जण मृत्यू जवळून पाहण्याचा दावा करतात, पण अमेरिकेच्या ६२ वर्षीय शेरॉन मिलिमनची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही! तिचा दावा ऐकून अंगावर काटे येतील. ती म्हणते की तिने चार वेळा मृत्यूचा सामना केला, आत्मा स्वर्गात गेला आणि प्रत्येक वेळी ती तिच्या खऱ्या आयुष्यात परतली.
डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, शेरॉन वयाच्या १३ व्या वर्षी आपल्या आईसोबत समुद्रात पोहत असताना अचानक लाटांमध्ये ती अडकली. पाण्यात बुडत असताना तिचा आत्मा शरीराबाहेर गेल्याचे तिला जाणवले. पण नशिबाने तिला दुसरी संधी दिली, तटरक्षक दलाने तिला वाचवले आणि आत्मा पुन्हा शरीरात आला!
वयाच्या ४३ व्या वर्षी शेरॉनच्या अंगावर वीज कोसळली. रुग्णालयात नेत असताना तिचा आत्मा पुन्हा देह सोडून गेला होता. यावेळी आत्मा सरळ स्वर्गाकडे निघाला. तिथे तिला सोनेरी आणि गुलाबी रंगाचे ढग दिसले. स्वर्ग कसा दिसला यावर ती म्हणते की, मानवी कल्पनाही करू शकत नाही, इतका स्वर्ग सुंदर आहे.
एकदा शस्त्रक्रियेदरम्यान तिचे शरीर निष्क्रिय झाले आणि तिने पुन्हा तोच स्वर्गाचा प्रवास अनुभवला. चौथ्यांदा चुकून चुकीचं औषध घेतलं तेव्हाही आत्मा शरीर सोडून स्वर्गात गेला आहे असं तिला वाटत होतं.
शेरॉन जेव्हा जेव्हा स्वर्गात पोहोचली, तेव्हा तिथले तेजस्वी दिवे आणि आश्चर्यकारक शांतता तिने अनुभवली. तिने असा दावा केला की, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तिने म्हटले की, तिथे तिने प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिले आणि त्याच्याशी बोलली. आता शेरॉनच्या या बातमीमुळे इंटरनेटवर चर्चेला उधाण आलं आहे. काही लोक याला दैवी अनुभव मानत आहेत, तर काही जण याला मानसिक भ्रम म्हणत आहेत. काहींनी शेरॉनला वेडे म्हटले, तर काहींनी याला धार्मिक श्रद्धेशी जोडले आहे.
संबंधित बातम्या