सोशल मीडियाच्या जमान्यात ब्यूटी हॅकच्या नावावर कोणता ना कोणता व्हिडिओ ट्रेंड मध्ये राहतो. मात्र अनेक लोक याचे अनुकरण करून नुकसान करून घेतात. जर तुम्ही अशा प्रकारचे हॅक्सचे अनुकरण करत असाल तर तुम्हाला समजूतदारपणा दाखवावा लागेल. नुकतेच सुमन नावाच्या कंटेंट क्रिएटरने आपल्या फॉलोअर्सला आकर्षित करण्यासाठी एक असेच काम केले आहे. जे पाहून लोक थक्क झाले आहेत. सुमनने आपल्या केसांचा रंग बदलण्यासाठी आईस्क्रीमचा लेप लावला. सुमनने सांगितले की, अशा प्रकारचा हॅक तिच्या एका फॉलोवरने तिला ट्राय करण्यास सांगितले होते.
व्हायरल व्हिडिओनुसार सुमन तीन चॉकलेट आईस्क्रीम घेते व ते आपल्या केसांच्या शेंड्यांना लावून चोळते. सुमनने सांगितले की, जेव्हा कोणी हा व्हिडिओ तिला शेअर केला तेव्हा ही ट्रिक वापरण्याची तिची इच्छा झाली. व्हिडिओच्या दुसऱ्या भागात सुमन २० मिनिटांनंतर आईस्क्रीम लावलेले केस धुते. तेव्हा तिला समजते की, तिचे केस जैसे थेच आहेत. परिणाम समोर होता. सुमनच्या केसांवर हे ब्लूटी हॅक काम करू शकले नाही. मात्र या व्हिडिओने सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अनेक यूजर्सने हा विचित्र प्रयोग केल्याप्रकरणी सुमनची खिल्ली उडवली आहे. तर काही लोकांनी खाण्याच्या वस्तूंची नासाडी केल्याचा सुमनवर आरोप लावला आहे. एका इंस्टाग्राम यूजरने खोचक सल्ला देत म्हटले आहे की, पुढच्या वेळी केसांना च्यूइंग गम ट्राय कर. तसेच अन्य एक यूजरने लिहिले की, पुढच्या वेळी फेव्हीक्विकचा वापर करण्याचा प्रयत्न कर.
संबंधित बातम्या