US Elections : होणाऱ्या नवऱ्यानं मतदान केलं नाही म्हणून तरुणीनं लग्नच मोडलं! सोशल मीडियावर पिटली दवंडी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  US Elections : होणाऱ्या नवऱ्यानं मतदान केलं नाही म्हणून तरुणीनं लग्नच मोडलं! सोशल मीडियावर पिटली दवंडी

US Elections : होणाऱ्या नवऱ्यानं मतदान केलं नाही म्हणून तरुणीनं लग्नच मोडलं! सोशल मीडियावर पिटली दवंडी

Published Nov 06, 2024 11:54 AM IST

US elections Update : अमेरिकेत सध्या अध्यक्षपदाची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत एका तरुणीनं तिच्या होणाऱ्या नवऱ्याने मतदान केलं नाही म्हणून लग्न मोडलं आहे. ही घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.

मतदान केलं नाही म्हणून तरुणीनं मोडलं लग्न! अमेरिकन निवडणुकीत भारतासारखं वातावरण
मतदान केलं नाही म्हणून तरुणीनं मोडलं लग्न! अमेरिकन निवडणुकीत भारतासारखं वातावरण (AFP)

US elections Update : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे.  डोनाल्ड ट्रम्प विजयाच्या टप्पा गाठतांना दिसत आहेत. अमेरिकेत निवडणुकांबाबत नागरिकांदेखील मोठा उत्साह असून या निवडणुकीसाठी अनेकांनी आपले वैयक्तिक संबंध देखील पणाला लावले आहेत. मतदान न केल्यामुळे एका २६ वर्षीय तरुणीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी संबंध तोडले आहे. तिनं तीचं लग्न मोडलं असून ही बाब तिने सोशल मिडियावर जाहीर केली आहे. त्यामुळे ही घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. 

 या महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये तिने तिचं लग्न मोडल्याची घोषणा केली. तिच्या होणाऱ्या पतीने मतदान केलं नाही त्यामुळे तिने हा निर्णय घेतला असल्याचं पोस्टमध्ये लिहिलं आहे. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.  'माझ्या प्रियकराने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान केलं नाही. त्यामुळे माझ्यासमोर नैतिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळें मी त्याच्यासोबतचा तोंडलेला साखरपुडा चुकीचं ठरेल का?" असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.  

तरुणीने लिहिलं आहे की, "आम्ही फ्लोरिडामध्ये राहतो. माझ्या भावी पतीने मतदान करण्यास नकार दिला. तो म्हणतो की मला कोणताही उमेदवार आवडत नाही. "माझी आणि माझ्या होणाऱ्या नवऱ्याची विचारसरणी एकच आहे.  पण त्याचा  मतदान न करण्याचा निर्णय मला पटलेला नाही. आपल्या मतदानाच्या हक्कापासून आपण दूर का राहायचे? अमेरिकेच्या ४७  व्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदानाचा शेवटचा दिवस होता आणि आता निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंतच्या निकालांमध्ये ट्रम्प  पुढे असल्याचं दिसत आहे.

आता सोशल मीडियावर बोलायचे झाले तर काही लोकांनी महिलेच्या या कृतीचं समर्थन केले, तर अनेकांचे म्हणणे आहे की, होणाऱ्या नवऱ्यासोबत नातं तोडणं हा चुकीचा निर्णय आहे. मतदान हा कोणाचाही वैयक्तिक निर्णय असतो, असे या लोकांचे म्हणणे आहे. तो मतदान करतो की नाही, किंवा कोणाला मत देतो. त्या आधारे नातं टिकवण्याचा किंवा तोडण्याचा निर्णय घेऊ नये. एका युजरने लिहिले की, 'तुम्ही तरुणीच्या या निर्णयामुळे तिच्या बद्दल मत बनवू शकत नाही. आपण कुण्याच्या वागण्यावर आणि आवडीवर  नियंत्रण ठेवू शकत नाही. हा त्यांचा स्वतःचा निर्णय आहे. एखाद्याला मतदान करताना आपल्यासोबत राहण्याचा अधिकार असावा असे तुम्हाला वाटत असेल, तर ते जे ठरवतील ते ठरवतात. नातं तोडण्यासाठी तुम्ही कोणतेही निमित्त ठरवू  शकता, असे एका युझरने लिहिलं आहे. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर