मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बाबो..! दीड महिन्यात भीक मागून कमावले २.५० लाख रुपये, भिकारी महिलेची संपत्ती ऐकून व्हाल थक्क

बाबो..! दीड महिन्यात भीक मागून कमावले २.५० लाख रुपये, भिकारी महिलेची संपत्ती ऐकून व्हाल थक्क

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 13, 2024 08:11 PM IST

इंदूरमध्ये एका महिलेने ५४ दिवसात आपल्या मुलांच्या मदतीने भीक मागून अडीत लाख रुपये कमावल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकेच नव्हे तर भीक मागून तिने दोन मजली घर, महागडा स्मार्टफोन, मोटारसायकल, जमीन आदि संपत्ती मिळवली आहे.

file Image
file Image

आपल्या मुलांना भीक मागण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी इंदिरा बाई नावाच्या एका महिलेला इंदूर पोलिसांनी अटक केली आहे. सांगितले जात आहे की, या भिकारी महिलेने सुमारे ६ आठवड्यात  २.५लाख रुपये कमावले आहेत. इतकेच नाही तर ज्या एनजीओने महिलेला तिच्या मुलासह अटक करण्यास मदत केली, त्यांनी दोघांकडून २० हजार रुपयेही वसूल केले.

अटक केल्यानंतर महिलेने सांगितले की, तिच्याकडे एक जमिनीचा तुकडा, दोन मजली घर, एक मोटरसायकल, २० हजार रुपयांचा एक स्मार्टफोन आणि सहा आठवड्यात कमावलेले अडीच लाख रुपये आहेत. 

वारंवार गुन्हे करणे तसेच आपल्या मुलांना भीक मागण्यासाठी मजबूर केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तिला अटक करून रिमांडवर पाठवले आहे. तिच्या एका मुलीला  एनजीओच्या निरीक्षणात ठेवले आहे. भुकेने मरण्यापेक्षा भीक मागणे आम्ही निवडले. चोरी करण्यापेक्षा भीक मागणे कधीही चांगले. 

खुपच प्लॅनिंगने मागत होती भीक -
इंदिराला एका सात वर्षीय मुलीसोबत अन्य ४ मुले आहेत. त्याचे वय १०, ८, ३ व २ वर्षे आहे. महिला आपला भीक मागण्याचा व्यवसाय खूपच प्लॅनिंग करून करत होती. ती मोठ्या मुलांना इंदूरच्या लव-कुश चौकात उभे करत होते. तेथून उज्जैनकडे रस्ता जातो ज्यावर महांकाळचे भक्त मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात. तिने पोलिसांना सांगितले की, उज्जैनला जाणारे भाविक कधीली भिकाऱ्यांना हाकलून देत नाहीत. उज्जैनहून दर्शन करून येणाऱ्यांबाबत तिने म्हटले की, असे लोक दानधर्म करण्यास नकार देत नाहीत.

तिने दावा केला की, महाकाल कॅरिडॉर निर्माणानंतर तिची कमाई वाढली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, महाकाल लोक निर्माणानंतर पर्यटकांच्या संख्या आधी २,५०० प्रतिदिन होती आता वाढून १.७५ लाख प्रतिदिन झाली आहे.

इंदिराबाईला ९ फेब्रुवारीला भीक मागताना अटक केली. तिचा पती आपल्या दोन मुलासह पळून गेला आहे. पोलिसांनी इंदिराकडून १९,६०० रुपये तर तिच्या मुलीकडून ६०० रुपये जप्त केले आहेत. 

महिला राजस्थानमधील कोटा येथील राहणारी आहे. तेथे तिचे दोन मजली घर आहे. त्याचबरोबर तिच्याकडे जमीनही आहे. इतकेच नाही तर तिच्याकडे स्मार्टफोन आणि पतीकडे मोटरसायकल आहे. ही सर्व संपत्ती तिने भीक मागून मिळवली आहे.

WhatsApp channel