Viral News: हैदराबादच्या बंजारा हिल्स भागात एका महिलेने ट्रॅफिक होमगार्डला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित महिला विरुद्ध दिशेने कार चालवत होती. त्यावेळी ट्रॅफिक होमगार्ड महिलेला अडवले. त्यानंतर हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
२४ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजून २० मिनिटांनी ही घटना घडल्याचे व्हिडिओवरील टाईम स्टॅम्पवरून स्पष्ट होत आहे. व्हिडिओमध्ये एक महिला भररस्त्यात ट्रॅफिक होमगार्डशी वाद घालताना दिसत आहे. संबंधित महिला विरुद्ध दिशेने गाडी चालवत होती. त्यावेळी ट्रॅफिक होमगार्डने तिला अडवले. त्यावेळी महिलेने त्याला गाडीचा फोटो काढून सोडून देण्यास सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ट्रॅफिक होमगार्डला शिवीगाळ देताना दिसत आहे. त्यानंतर रस्त्यावरील काही लोकांनी मध्यस्ती करत वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्यानंतरही महिला शांत झाली नाही, असे एका प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सगळा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. या व्हिडिओत महिलेने ट्रॅफिक होमगार्डवर हल्ला केला.
अर्धा तास तिने आपली कार रस्त्याच्या मधोमध उभी ठेवल्याने इतरांची गैरसोय झाली. तिने होमगार्डशी वाद घातला आणि आक्षेपार्ह विधाने केली,' अशी माहिती बंजारा हिल्सचे एसआय (ट्रॅफिक) राकेश रेड्डी यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिली. विघ्नेशच्या तक्रारीवरून पोलिसांनी महिलाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला. मात्र, अद्याप तिला चौकशीसाठी बोलावण्यात आलेले नाही.
हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. 'आवश्यक ती कारवाई करा आणि गरज पडल्यास त्या महिलेवर गुन्हा दाखल करा,' असे एका एक्स युजरने लिहिले आहे. पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी आणखी एकाने केली आहे. 'आजकाल ही फॅशन बनली आहे. ड्युटीवर असलेल्या पोलिसावर हल्ला करण्याचे धाडस ती कशी करू शकते, तेही चुकीच्या बाजूने गाडी चालवताना? कृपया संबंधित चालकावर कडक कारवाई करा,' असे तिसऱ्याने लिहिली आहे.