घरातील एसीमुळं आईसह दोन मुलांचा मृत्यू, दुपारी झोपेत असतानाच...; नेमकं काय घडलं? वाचा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  घरातील एसीमुळं आईसह दोन मुलांचा मृत्यू, दुपारी झोपेत असतानाच...; नेमकं काय घडलं? वाचा

घरातील एसीमुळं आईसह दोन मुलांचा मृत्यू, दुपारी झोपेत असतानाच...; नेमकं काय घडलं? वाचा

Nov 04, 2024 11:18 AM IST

Rajasthan AC short circuit News: राजस्थान येथील एसीमुळे घराला लागलेल्या आगीत आईसह तिच्या दोन मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

घरातील एसीमुळं आईसह दोन मुलांचा मृत्यू
घरातील एसीमुळं आईसह दोन मुलांचा मृत्यू

Rajasthan Fire News: राजस्थानच्या जालोरमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली. घरातील एसीमुळे घराला लागलेल्या आगीत आईसह तिच्या दोन मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. एकाच वेळी घरातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरातील लोक स्तब्ध झाले आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. जालोरमधील महावीर चौराहा परिसरातील एका घरात ही हृदयद्रावक घटना घडली.

कविता ठाकूर (वय, ३५), मुलगा ध्रुव ठाकूर (वय,१०) आणि मुलगी गौरवी ठाकूर (वय ५) अशी मृतांची नावे आहेत. कविता यांचा पती चेतन कुमार हा एका खासगी शाळेत शिक्षक असून तो कामानिमित्त सिरोही येथे गेला. तर, कविता यांची सासू नातेवाईकाच्या घरी गेली होती. कविता आणि त्यांची दोन्ही मुले घरात एकटीच होती. दरम्यान, रविवारी दुपारी शेजाऱ्यांना चेतन कुमार यांच्या घरातून धूर येत असल्याचे समजले.यानंतर शेजाऱ्यांनी चेतन कुमारच्या घराकडे धाव घेऊन त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. मात्र, मात्र दरवाजा आतून बंद होता. यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी चेतन कुमार यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता कविता आणि त्यांची दोन्ही मुले जमीनीवर जखमी अवस्थेत आढळून आली. तसेच घरातील सर्व काही जळून खाक झाले होते.

घटनेची चौकशी सुरू

यानंतर पोलिसांनी तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवले. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नसून घरातील एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी अस्कमित मृत्युची नोंद केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

केरळमधील मंदिराला लागलेल्या आगीत आणखी दोघांचा मृत्यू

केरळमधील नीलेश्वरमजवळील एका मंदिरात लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आणखी दोघांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या चारवर पोहोचली आहे. या घटनेत गंभीर भाजलेल्या बिजू (वय, ३८) आणि शिबिनराज (वय, १९) या दोघांचा रविवारी रात्री मृत्यू झाला. यापूर्वी या अपघातात जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला होता. कासरगोड जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत १५४ लोक जखमी झाले. त्यापैकी १०० जणांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नीलेश्वरमजवळील अंजुट्टनबलम वीररकावू मंदिरात २८ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा परिसरात साठवलेल्या फटाक्यांचा स्फोट झाल्याची घटना घडली. स्फोटक पदार्थ कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केल्यानंतर मंदिर समितीच्या दोन अधिकाऱ्यांसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर