Viral Fact Check : भारतीय शिक्षण पद्धतीत काही महत्वाचे टप्पे आहेत. यात १० वी बोर्डाच्या परीक्षा हा महत्वाचा भाग आहे. या परीक्षांचे पालकांना व विद्यार्थ्यांना टेंशन असतं. त्या दृष्टीने मुलांची तयारी देखील करून घेतली जाते. मात्र, संपूर्ण देशात १० वी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात येणार अशी एक बातमी व्हायरल होत आहे. या वृत्ताचा तपास केला असता खरं सत्य पुढं आलं आहे.
भारतातील अनेक राज्यांमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढील महिन्यात आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यापूर्वी सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यात दावा करण्यात आला आहे की, यापुढे दहावी बोर्डाच्या परीक्षा होणार नाहीत. या वृत्ताची सत्यता तपासण्यात आली.
यापुढे दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा होणार नाहीत, असा दावा करणारी पोस्ट पीआयबी अर्थात प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने शेअर केली आहे. व्हायरल मेसेजनुसार, 'नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. भारत सरकारने प्रस्तावित केलेल्या केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर तब्बल ३६ वर्षांनंतर देशात नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले आहे.
यात पुढं असं म्हटलं आहे की, आता केवळ १२ वी बोर्ड परीक्षा होणार आहे. तर एमफिल देखील बंद केले जाणार आहे. कॉलेजची पदवी ही ५ वर्षांची राहणार आहे. तर दहावी बोर्ड रद्द करण्यात येणार आहे. इयत्ता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मातृभाषा, स्थानिक भाषा आणि राष्ट्रभाषा शिकवली जाणार आहे. यापूर्वी दहावी बोर्ड रद्द करण्यात येणार आहे असा दावा व्हायरल पोस्ट मध्ये करण्यात आला आहे.
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दहावीच्या परीक्षा होणार नाहीत, असा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा दावा खोटा आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने तसा कोणताही आदेश जारी केलेला नाही. त्यामुळे पालकांनी अशा चुकीच्या पोस्टवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या