मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Julian Assange : विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांजे यांना अमेरिकेनं सोडलं, हेरगिरीच्या आरोपावरून होते तुरुंगात

Julian Assange : विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांजे यांना अमेरिकेनं सोडलं, हेरगिरीच्या आरोपावरून होते तुरुंगात

Jun 26, 2024 10:53 AM IST

wikileaks founder julian assange released : विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांजे यांची तुरुंगातून सुटका होणार आहे. अमेरिकच्या हेरगिरीच्या आरोपात दोषी ठरल्यानंतर, ब्रिटनमधील त्याची शिक्षा रद्द करण्यात आली. असांजे यांना ऑस्ट्रेलियाला परत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

 विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांजे यांना अमेरिकेनं सोडलं, हेरगिरीच्या आरोपावरून होते तुरुंगात
विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांजे यांना अमेरिकेनं सोडलं, हेरगिरीच्या आरोपावरून होते तुरुंगात

wikileaks founder julian assange released : विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांजे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेची हेरगिरी केल्या प्रकरणी असांजे हे ब्रिटनच्या तुरुंगात कैद होते. ब्रिटनमधील त्यांची शिक्षा रद्द करण्यात आली असून त्यांना ऑस्ट्रेलियात परतण्याची परवानगीही देण्यात आली आहे. ५२ वर्षीय ज्युलियन असांजे यांच्यावर अफगाणिस्तान आणि इराकमधील युद्धांशी संबंधित अमेरिकन लष्करासंबंधी गुप्त व संवेदनशील  माहिती लीक केल्याचा आरोप आहे.

असांजे यांनी अमेरिकेचे अफगाण युद्धाशी संबंधित अनेक संवेदनशील कागदपत्र इंटरनेटच्या माध्यमांतून हॅक करून ते इंटरनेटवर प्रसिद्ध केले होते. याप्रकरणी अमेरिकेविरोधात कट रचल्याप्रकरणी असांजे यांना दोषी ठरवण्यात आले होते. ज्युलियन असांजे यांनी अमेरिकन कोर्टात गुन्हा कबूल केल्यानंतर आता त्याची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांना ६२ आठवड्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र ही शिक्षा त्यांनी या पूर्वीच भोगली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

विकीलीक्सचे मुख्य संपादक क्रिस्टीन हार्फसन म्हणाले की, असांजे यांना सोडण्यासाठीचा हा करार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या मध्यस्ती नंतर झाला. हे प्रकरण गेल्या काही वर्षापासून सुरू होते. विकिलिक्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की या प्रकरणी अंसाजे यांची सुटका झाली असून ते ऑस्ट्रेलिया येथे येण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यांनी विमानात चढण्यापूर्वी अनेक कागदपत्रावर स्वाक्षरी करताना दिसले.

काय आहे विकिलिक्सचे संपूर्ण प्रकरण?

२०१० मध्ये, विकिलिक्सने अफगाणिस्तान आणि इराकमधील अमेरिकेशी संबंधित अनेक संवेदशील माहिती अमेरिकेच्या साईटवरून हॅक करून ती लिक केली. अमेरिकेच्या लष्करी इतिहासातील हे सर्वात मोठे लिक प्रकरण होते. अनेक गोपनीय माहिती उघड झाल्याने अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेचे उल्लंघन केल्याचा आरोप अंसाजे यांच्यावर ठेवण्यात आला होता. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीत विकिलिक्सने मोठ्या प्रमाणावर गुप्त अमेरिकन दस्तऐवज जाहीर केल्याबद्दल असांज यांच्यावर महाभियोग खटला चालवण्यात आला होता. ही कागदपत्रे चेल्सी मॅनिंगने लीक केली होती. अमेरिकेचे माजी लष्करी गुप्तचर विश्लेषक मॅनिंग यांच्यावरही अमेरिकेच्या हेरगिरी कायद्यांतर्गत खटला चालवण्यात आला होता. ७,००,००० हून अधिक दस्तऐवज लिक करण्यात आले होते. ज्यात शस्त्रास्त्र, रणनीती आणि घेण्यात आलेल्या निर्णया बद्दल माहिती होती. यात इराकमधील संशयित बंडखोरांवर अमेरिकेने अपाचे हेलिकॉप्टरद्वारे गोळीबार करत अनेकांना ठार मारल्याचा २००७ चा व्हिडिओचाही समावेश होता.

असांजे यांच्यावरील आरोपांमुळे त्यांच्या अनेक समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. ऑस्ट्रेलियन सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, “पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी स्पष्ट केले आहे की असांजे यांचे प्रकरण खूप लांबले आहे आणि त्याला तुरुंगात ठेवून काहीही साध्य होणार नाही.”

असांजे यांच्या विरोधात २०१० मध्ये युरोपियन अटक वॉरंटवर निघाल्यावर त्यांना ब्रिटनमध्ये पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. स्वीडिश अधिकाऱ्यांनी सांगितले की अंसाजे यांची लैंगिक अत्याचार या गुन्ह्याच्या आरोपांबद्दल देखील चौकशी करायची आहे. स्वीडनला प्रत्यार्पण टाळण्यासाठी अंसाजे हे इक्वेडोरच्या दूतावासात गेले. या ठिकाणी ते ७ वर्षे राहिले. २०१९ मध्ये त्यांना दूतावासातून अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची रवानगी ही लंडनमधील बेलमार्श तुरुंगात करण्यात आली होती.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर