विमानात फ्लाइट मोड विसरा! आता वापरा मनसोक्त इंटरनेट; कॉलही करता येणार, वाचा सविस्तर
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  विमानात फ्लाइट मोड विसरा! आता वापरा मनसोक्त इंटरनेट; कॉलही करता येणार, वाचा सविस्तर

विमानात फ्लाइट मोड विसरा! आता वापरा मनसोक्त इंटरनेट; कॉलही करता येणार, वाचा सविस्तर

Dec 09, 2024 02:32 PM IST

Wifi In Flight : पूर्वी विमानात प्रवास करत असतांना फोन हा फ्लाइट मोडवर ठेऊन बंद ठेवावा लागत होता. मात्र, आता विमानात देखील इंटरनेट वापरता येणार आहे. काही विमान कंपन्यांनी ही सेवा सुरू केली आहे.

विमानात फ्लाइट मोड विसरा! आता वापरा मनसोक्त इंटरनेट; कॉलही करता येणार, वाचा सविस्तर
विमानात फ्लाइट मोड विसरा! आता वापरा मनसोक्त इंटरनेट; कॉलही करता येणार, वाचा सविस्तर (pexel)

Wifi In Flight : पूर्वी विमान प्रवास करतांना फोन हा आपोआप बंद होत असे. विमानात नेटवर्क नसल्याने फोन हा फ्लाइट मोडवर ठेवून बंद करावा लागत होता. यामुळे इंटरनेट पासून प्रवासी पूर्णपणे दूर राहत होते. मात्र, आता विमानात देखील इंटरनेट वापरता येणार आहे. प्रवाशांसाठी ही आनंदांची बातमी आहे. विमानातसुद्धा प्रवाशांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी दिली जाणार आहे. भारतात एयर इंडियाने ही सुविधा सुरू केली आहे. विमानात वायफाय सुविधा देण्यासाठी सरकारने काही नियमांमध्ये बदल केला आहे.

सरकारने विमानात इंटरनेट वापरण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. काही नियम बदलल्याने आता विमान प्रवासादरम्यान आता मनसोक्त इंटरनेट वापरणे शक्य होणार आहे. विमान उड्डाणादरम्यान प्रवासी ३ हजार मीटर उंची गाठल्यानंतरच विमानात ही वायफाय सेवा वापरू शकणार आहे. जमिनीवरील दूरसंचार सुविधेत व्यत्यय येऊ नये यासाठी ही ऊंचीची मर्यादा ठेवण्यात आली आहे.

फ्लाइट अँड सी कनेक्टिव्हिटी (सुधारणा) नियम, २०२४ मार्फत ही सेवा प्रवाशांना विमानात वापरता येणार आहे. ज्या विमानात इलेक्ट्रीक उपकरणे वापरण्याची परवानगी असेल तेथे इंटरनेट सुविधा वायफायमार्फत पुरवली जाईल. या सेवेचा पूर्ण कंट्रोल कॅप्टनकडे असेल. आवश्यकता नसेल तेव्हा वायफाय बंद सुद्धा करता येणार आहे.

टाटा सन्स आणि एसआयएच्या मालकीच्या विस्तारा एअरलाइन्सने बोईंग ७८७-९ या ड्रीमलायनर विमानात ही मोफत इंटरनेट सेवा देण्यास सुरुवात केली आहे. या प्रकारची सेवा देणारी ही पहिली सेवा असणार आहे. दिल्ली ते लंडन या विमान प्रवासात ही सुविधा दिली जाणार आहे. सर्व प्रवासी फ्लाइट दरम्यान मर्यादित काळासाठी या सेवेचा लाभ घेऊ शकणार आहे. सुमारे ३५ हजार फूट उंचीवर उड्डाण करतानाही प्रवाशांना इंटरनेट वापरता येणार आहे. या सुविधेचा व्यावसायिकांना सर्वाधिक फायदा होणार आहे. विमानात आता ते महत्वाची कामे, मिटींग आणि फोन कॉल किंवा महत्वाचे मेसेज देखील करू शकणार आहेत.

विमानात इंटरनेट वापरण्यासाठी काय करावे लागेल ?

१ विमानात बसल्यावर तुम्हाला आधी फ्लाइट मोड ऑन करावा लागणार आहे. यानंतर विमान ठराविक ऊंचीवर गेल्यानंतर विमानातील इंटरनेट सुविधा सुरु केली जाणार आहे.

२ यानंतर मोबाइलमधील वायफाय सुरू करावे लागेल. यानंतर फोनचे वायफाय विमानातील इंटरनेट डिव्हाईसशी जोडावे लागणार आहे.

३. यानंतर एयर इंडिया पोर्टलच्या डिफॉल्ट ब्राऊझरवर लॉग ईंन करून इंटरनेट सुविधेचा वापर करता येणार आहे.

४. यानंतर पासवर्ड आणि आणखी काही डिटेल्स भरून तुम्हाला नेटवर्क वापरता येणार आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर